spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सोमवारपासून मुंबईसह ठाण्यात जोरदार पावसाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून मुबंईत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसत आहे. रोज संध्याकाळी येणाऱ्या पावसामुळे अनेक चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे. पण आता हवामान खात्याने मुंबईसह ठाण्यात (Mumbai, Thane) जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवारपासून पावसाचा जोर महाराष्ट्रमध्ये वाढणार आहे. पण मुंबईसह ठाण्यात मेघगर्जनेसह (Thunder stroam) सुसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस (heavy rainfall) बारसण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:  Grandparents Day २०२२: ११ सप्टेंबर रोजी तुमच्या आजी-आजोबांना शुभेच्या देण्यासाठी काही खास कल्पना

मुंबईमध्ये पावसाने काही दिवसासाठी विश्रांती घेतली होती पण गणपती बाप्पांचं आगमन झालं आणि पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. मुंबईसह रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या ४ ते ५ दिवस हि तीव्रता कायम राहणार आहे असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत. १२ सप्टेंबरपासून पावसाची तीव्रता मुंबईसह ठाण्यात आणखी वाढणार आहे अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याच वेळी कोकणात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.

तसेच राज्यातील डोंगर व घाट परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटर महिती देण्यात आली आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी अचानक बरसलेल्या पावसाने मुंबईकरांची धावपाल झाली. संपूर्ण रस्त्यात तलावाचे स्वरूप आले होते तर लोकल ट्रेन (Local train ) अर्धा तास उशीराने धावत होत्या. सध्या पुण्यात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या सरी सुद्धा कोसळत आहे. मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे पण पावसाला अजूनही सुरवात झाली नाही आहे.

हे ही वाचा:

सत्तासंघर्ष सुरु असताना मुख्यंमत्री व सरन्यायाधीश लळीत यांच्या भेटीनंतर, विरोधकांच्या भुवया उंचावल्या

शिवसेना व शिंदे गटातील वादानंतर आज दादर पोलीस स्टेशनबाहेर राडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss