नाशिक मध्ये पावसाचे जोरदार आगमन

आज अचानक नाशिक मध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. प्रशासनाने नागरीकांना सतर्क राहण्याचा ही इशारा दिला आहे. 

नाशिक मध्ये पावसाचे जोरदार आगमन
पहिल्या पावसानंतर जवळपास पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी गरजेपेक्षा जास्त पाऊस पडत असून काही ठिकाणी तर शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
यंदाचा पाऊस म्हणावा तसा पडत नसल्याने कधी उन तर कधी रिमझिम पाऊस अशी परिस्थिती अनेक ठिकाणी पहायला मिळतेय. आज अचानक नाशिक मध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे संपुर्ण शहरात प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. अशातच प्रशासनाने नागरीकांना सतर्क राहण्याचा ही इशारा दिला आहे.
हवामान खात्याने दुपारी दीड ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत नाशिक व आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाचे संकेत दिले होते. यासोबतच, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होईल असेही सांगण्यात आले होते. व नागरीकांना सतर्क राहण्यास सांगितले होते. शहरात पावसाने आगमन केल्यानंतर अनेक ठिकाणी अचानक लाईट गेल्याने नागरीकांना समस्या निर्माण झाल्या आहेत. या पावसामुळे  गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली स्मार्ट कामे रखडली आहेत.
Exit mobile version