Rain alert : एकनाथ शिंदेचं ठाणे, पाण्यात बुडालं

Rain alert : एकनाथ शिंदेचं ठाणे, पाण्यात बुडालं

महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये काल रात्रीपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे, तर नद्या दुथडी भरून वाहत आहेत. ठाणे जिल्ह्यात तर या वर्षातल्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत ठाण्यामध्ये 94 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाण्यातल्या भिवंडीमध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आहे, तसंच काही घरंही पाण्याखाली गेली आहेत. ठाणे शहरातील मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर, पूर्व द्रुतगती महामार्ग, कशेळी काल्हेर मार्ग आणि कळवा भागात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ठाणे पोलिसांनीही रस्ते मार्गाने प्रवास टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

हेही वाचा : 

boycott thankgodmovie : अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्राचा ‘थँक गॉड’ ह्या चित्रपटावर बहिष्कार टाकायची ‘या’ देशाची मागणी

जिल्ह्यात सकाळपासून ठाणे, कल्याण- डोंबिवली, अंबरनाथ, भिवंडी शहरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे या भागात आता पावसाचे पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. शहरातील मुख्य मार्ग असलेल्या मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे साकेत ते घोडबंदर येथील ब्रम्हांड, भिवंडीतील मानकोली, पूर्व द्रुतगती महामार्गावर कोपरी पूल ते माजीवडा, कशेळी काल्हेर आणि कळवा परिसरात विविध ठिकाणी कोंडी झाली आहे. यात अनेक शाळेच्या बसगाड्या आणि रुग्णवाहिका अडकून आहेत.

लम्पीपासून जनावरांचा बचाव करण्यासाठी आता क्वारंटाईन सेंटर उभारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार १६ आणि १७ सप्टेंबर म्हणजे आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. तसेच उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या भागात देखील हवामान विभागानं पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मोकळे?

Exit mobile version