spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आज राज्यात ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जाणून घ्या…

राज्यात मागील जवळपास महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने (rain) राज्यात दमदार हजेरी लावली आहे.

राज्यात मागील जवळपास महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने (rain) राज्यात दमदार हजेरी लावली आहे. मुंबई (Mumbai), नाशिक (Nashik), आणि कोकण (Kokan) यासह राज्यातील अनेक भागात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. यादरम्यान येत्या दोन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ऑगस्ट (August) महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र सप्टेंबर (September) महिन्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं आहे.

पुढील ४८ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून मुंबई ऑरेंज अलर्ट तर पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि सिंधुदूर्ग जिल्हांना ‘येलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईत ७, ८ आणि ९ सप्टेंबर रोजी मध्यम पाऊस तर १० सप्टेंबरला वादळी वारे आणि गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याने मुसळाधार पावसाच्या शक्यतेचा इशारा दिल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही तास महत्वाचे असणार आहेत.

पुणे (Pune) वेधशाळेने देखील राज्यात येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगीतले आहे. ०८ आणि ०९ सप्टेंबर रोजी ढगांच्या गडगटांसह जोरदार पावसाची शक्यता अशी माहिती देण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस तर पुण्यात ढगाळ आकाश, तसेच मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. १४ सप्टेंबर संध्याकाळनंतर पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवन्यात आली आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

हे ही वाचा: 

राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२३, जर आज तुम्ही प्रवासाला जाणार असाल तर आपले किमती वस्तूंची काळजी घ्या कारण…

भंडारा उधळ्यानंतर विखे पाटील यांनी दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss