spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. काही भागात तुरळक तर काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दांडी मारल्यानंतर आता पुन्हा पडायला सुरुवात केली आहे.

राज्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. काही भागात तुरळक तर काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दांडी मारल्यानंतर आता पुन्हा पडायला सुरुवात केली आहे. खरिपाची पीक वाचवण्यासाठी राज्यातील सर्वच शेतकरी चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आजही राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मागील चार ते पाच दिवसापासून राज्यात पावसाने पुन्हा पडायला सुरुवात केली आहे. मात्र पुढचे चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सून आता पश्चिमेकडे सरकत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये हळूहळू पावसाचं प्रमाण वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. आज मराठवाड्यासह संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे शेती पिकांना त्याचा काही प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसला. त्यानंतर पुन्हा जुलै महिन्यात थोडा पाऊस पडल्यानंतर पिकांना जीवनदान मिळाले होते. राज्यात पुढील दिवसात पाऊस पडला नाही तर पीक नष्ट होऊन जातील. ग्रामीण भागातील पाझर तलाव देखील आटले आहे.

राज्यभरात कमी पाऊस पडल्यामुळे त्याचा फटका शेती पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. तूर, सोयाबीन, मका, कांदा, फळबागा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील महिन्यात २१ दिवसापेक्षा पण कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी काही भागात पिके वाया गेली. त्यामुळे शेतकरी आता नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.

हे ही वाचा: 

मुंबई विमानतळावर मोठा अपघात, विमान क्रॅश

राज ठाकरे यांनी दिला राज्य सरकारला टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss