राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात काही प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज संपूर्ण राज्यभरात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात काही प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज संपूर्ण राज्यभरात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. सप्टेंबर महिन्यात पडल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे पण अजूनही राज्यात खरीपातील शेतीला आवश्यक असा पाऊस पडला नाही आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे. मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात येल्लो अर्लट (Yellow Alert) देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासून शेतकरी चांगल्या पावसाची अपेक्षा करत आहते. दरम्यान या पावसाच्या पार्शवभूमीवर नागरिकांनी योग्यती काळजी घ्यावी असे आव्हान करण्यात आले आहे. शेतीतील कोमेजलेली पीक पुन्हा उभी राहण्यासाठी पावसाची गरज आहे. राज्यात मान्सून उशीरा दाखल झाल्यामुळे संपूर्ण जून महिना कोरडा गेला. त्यानंतर जुलै महिन्यात चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडला. मात्र पुन्हा ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी पडल्यामुळे शेतकर्यांची पीक सुकून गेली. पण आता पडत असेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळणार आहे. कमी पावसामुळे ग्रामीण भागातील तलाव आटून गेली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्मण झाला होता. पण आता सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे काही प्रमाणत ग्रामीण भागात तलाव भरण्यास मदत होणार आहे.

यावर्षी पावसावर एल निनोचा (El Nino) प्रभाव दिसून आला आहे. प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या एल निनोमुळे भारतातील हवामानावर परिणाम होत आहे. त्यामुळे भारतात यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला. एल निनोचा प्रभाव आणि त्यामुळे भारताला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. दक्षिण अमेरिकेतील पश्चिम किनारपट्टी भागात प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्यामुळे होणाऱ्या हवामानबदलास ‘एल निनो’ म्हणतात. याचा परिणाम महाराष्ट्रातही झाला आहे. अनेक भागात पावसाची गरज आहे.

हे ही वाचा: 

उपोषण सोडताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया

१७ व्या दिवशी मनोज जरांगे यांनी उपोषण घेतले मागे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version