spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Heavy Rainfall : पुढील २४ तासात कोसळणार मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज

मुंबईमध्ये कालपासून ( १९जुलै ) पावसाने थैमान गाजवताना दिसत आहे. जराही विश्रांती न घेता पाऊस सतत कोसळत आहे. त्यातच पुढील २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळ पासून होणाऱ्या पावसामुळे उपनगरीय रेल्वेवर ही परिणाम झाला आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईला पावसाने झोडपले आहे. शिवाय विदर्भालाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये मुख्य काही क्षेत्रांना पावसाचा अलर्ट सांगण्यात आला आहे. त्याच सोबत कालपासून पडणाऱ्या या पावसामुळे वेस्टर्न, सेंट्रल आणि हर्बल रेल्वे १५ ते २० मिनिट उशिराने धावत आहेत. ज्यामुळे नोकरदार वर्गाचे हाल होत आहेत.

कोकणात सुद्धा धडकणार मुसळधार पाऊस :

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही पावसाने झोडपले आहे. शिवाय या जिल्ह्यांनाही दक्षचेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून कोकणात दमदार पाऊस होत आहे. मात्र त्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणा प्रमाणे गोव्यातही पाऊस धो-धो बसणार आहे. तिथेही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसाने केली मुंबईची तुंबई :

मुंबईत काल रात्री पासूनच जोरदार पाऊस होत आहे. शिवाय पुढील २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. पाहाटे पासून होणाऱ्या पावसामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेवरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे. शिवाय सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. अंधेरी सब वे, कुर्ला स्थानका बाहेरही पाणी साचले आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता गरज असल्यासच घरा बाहेर पडावे असे सांगण्यात आले आहे.  मुंबईत जवळपास शंभर मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई प्रमाणे नवी मुंबईतलाही पावसाने झोडपले आहे. ठाणे जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मध्य रेल्वे देखील पंधरा ते वीस मिनिटांनी उशिरा धावताना दिसत आहेत. नागरिकांनी सतर्कतेची काळजी घ्यावी असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्याच सोबत मालाड, कांदिवली, दहिसर व बोरिवली या सर्व ठिकाणी पावसामुळे पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

पावसामुळे नागपुरातील शाळांना सुट्टी वेळीच जाहीर करण्यात आली आहे :

नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, वर्धा या जिल्हा मध्ये विजेच्या कडकडाटासह अति मुसळधार पाऊस सुरू आहे.  पुढील तीन तास मेघ गर्जना आणि वादळी वाऱ्यांसह या जिल्ह्यांत  जोराच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज दिवसभरात नागपूर सह भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यात वीज पडण्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपुरात शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान  उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा ताशी 30-40 किमी वाहणार आहे. मराठवाड्यात ही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जोरदार पावसामुळे धारण क्षेत्र तुडुंब भरून वाहत आहेत :

कोल्हापुरात पावसाने जोर धरला आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुरु आहे. नद्याच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतेय. पंचगंगा नदीची पाणी पातळी ३५ फुटावर आहे. तर जिल्ह्यातील ७४ बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसान जोर धरल्यामूळ अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे.

हे ही वाचा:

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आली नवी खुशखबर; गणेशोत्सव निमित्त सोडणार ‘या’ विशेष ट्रेन

MUMBAI HIGH COURT नं फेटाळला युक्तिवाद ; विनाअनुदानित शाळांचा RTE प्रवेशाबाबतचा अध्यादेश केला रद्द

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss