विजेच्या कडकडाटासह रायगड जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू

विजेच्या कडकडाटासह रायगड जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू

रायगड जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून विजेच्या कडकडाटासह आणि वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गणेशउत्सवासाठी गावी गेलेल्या गणेशभक्तांचे हाल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. परंतु आज संध्याकाळ साडेचार वाजल्यापासून अचानक शहरात व राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह जोरदार पाऊस पडला सुरुवात झाली. पावसासोबत वाराही सुरू झाल्या आहे अवघ्या २० ते २५ मिनिटात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलेले पाहायला मिळाले.

हेही वाचा : 

महाराष्ट्रात ई-नोंदणीद्वारे घर खरेदी करणे झाले सोपे

मुंबई शहरात सोमवारी रात्री पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली होती. तर, मुंबईत उपनगरांत तुरळक सरी बरसल्या होत्या. मुंबईतील काही भागात मंगळवारी सकाळीही पावसाचा मुक्काम होता. मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. कडक उन पडल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. सोमवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. कुलाबा, सीएसएमटी, भायखळा, मलबार हिल या भागात मुसळधार पाऊस पडला. या भागात १० मि.मी. ते ४० मि.मी. पावसाची नोंद झाली. तर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात तुरळक सरी बरसल्या. ५ मि.मी. ते १५ मि.मी. पावसाची नोंद झाली.

बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी नखावरील धूळही उडणार नाही, आव्हाड यांचा बावनकुळे यांना जोरदार टोला

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून 8 सप्टेंबर राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे.

संजय राऊत यांनी जामीनासाठी केला अर्ज

Exit mobile version