Heavy Rainfall : अतिवृष्टीमुळे Konkan Railway झाली ठप्प ; काही रेल्वेगाड्या रद्द तर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग वळवले

दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. दिवाणखवटीजवळ ट्रॅकवरील दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल आहे. तिथला मलबा हटवण्याचे काम सुरू आहे,..

Heavy Rainfall : अतिवृष्टीमुळे Konkan Railway झाली ठप्प ; काही रेल्वेगाड्या रद्द तर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग वळवले

राज्यात कालपासून म्हणजेच १३ जुलै २०२४ पासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. जागोजागी मोठ्याप्रमाणावर कोसळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे पूर सुद्धा लोटला आहे. चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी रत्नागिरी : राज्यात रविवार मुसळधार पावसाने कहर केला होता. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही मोठा परिणाम झाला आहे. कोकण रेल्वे ठप्प झाली होती. तब्बल १५ तास उलटल्यानंतरही अजूनही कोकण रेल्वे ठप्पच आहे. कोकण रेल्वे सुरू होण्यासाठी अजून काही तास लागण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाली आहे.

दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. दिवाणखवटीजवळ ट्रॅकवरील दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल आहे. तिथला मलबा हटवण्याचे काम सुरू आहे, मात्र अति मुसळधार पावसामुळे काही अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरुन जाणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. याची माहिती कोकण रेल्वेनं आपल्या ट्विटर हॅण्डलवर दिली आहे. प्रवाशांना वेळापत्रक आणि ट्रेनचं स्टेटस पाहूनच बाहेर पडू नये असं आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आलं आहे.

आजही कोकण पट्ट्यात अति मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाने दिलं आहे. दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे तर दुसरीकडे छोटे-मोठे नदी नाले सुद्धा धोकादायक बनले आहेत त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दापोली तालुक्यातील जामगे-सातेरे नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीचे पाणी पुलावरून वाहत आहे. यामुळे नदीपलीकडच्या सात गावांचा संपर्क तुटला आहे. तर या ठिकाणची वस्तीला गेलेली एसटी अडकून पडली आहे. गेले दोन दिवस नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने शाळकरी मुले तसेच रुग्णांचे हाल सुरू आहेत. हा प[दिवसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे चकरमानी व इतरांनी याची काळजी घेऊनच बाहेर पडावे.

हे ही वाचा:

मंगेश देसाईकृत DHARMAVEER २ हा राजकीय डावपेच असेल की काही वेगळं ; यावर निर्मात्यांनी काय दिली प्रतिक्रिया जाणूयात सविस्तर

“माझी विधानसभेची जागा मी महायुतीला देईन , परंतु ..” ; BACHCHU KADU यांचे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version