HEAVY RAINFALL : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; Tulsi lake भागवणार मुंबईकरांची तहान

HEAVY RAINFALL : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; Tulsi lake भागवणार मुंबईकरांची तहान

मुंबईमध्ये कालपासून ( १९जुलै ) पावसाने थैमान गाजवताना दिसत आहे. जराही विश्रांती न घेता पाऊस सतत कोसळत आहे. त्यातच पुढील २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळ पासून होणाऱ्या पावसामुळे उपनगरीय रेल्वेवर ही परिणाम झाला आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईला पावसाने झोडपले आहे. शिवाय विदर्भालाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये मुख्य काही क्षेत्रांना पावसाचा अलर्ट सांगण्यात आला आहे. त्याच सोबत कालपासून पडणाऱ्या या पावसामुळे वेस्टर्न, सेंट्रल आणि हर्बल रेल्वे १५ ते २० मिनिट उशिराने धावत आहेत. ज्यामुळे नोकरदार वर्गाचे हाल होत आहेत.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.  मुंबईला पाणीपुरवठा करणारं ‘तुळशी तलाव’ (Tulsi lake) हे पहिलं धरण ओव्हरफ्लो झालं आहे. आज (२० जुलै) सकाळी साडेआठ वाजता धरण पूर्ण भरुन वाहू लागलं. त्यामुळे आता मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी ‘तुळशी तलाव’ हे ८०४.६ कोटी लीटर अर्थात ८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारं एक तलाव आहे. गेल्या वर्षी देखील हे तलाव २० जुलै २०२३ रोजीच मध्यरात्री १.२८ वाजताच्या सुमारास भरुन वाहू लागलं होतं. तर वर्ष २०२२ व वर्ष २०२१ मध्ये दिनांक १६ जुलै रोजीच ते ओसंडून वाहू लागलं होतं. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०२० मध्‍ये दिनांक २७ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होतं.

बृहन्‍मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (1.8 कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली. यंदाच्या उन्हाळ्यात भयंकर उकाड्यामुळे  मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे आटत चालली होती. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात जून महिन्यातही फार कमी पाऊस झाल्यामुळे मुंबईकरांना पाण्याची चिंता सतावत होती. मात्र, आता जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने पाण्याचा प्रश्न मिटवला आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईला पाणीपुरवठा करणारे उर्वरित तलावही लवकरच भरतील, अशी आशा आहे. जेणेकरून मुंबईतील पाणी कपात रद्द होईल.

धरणांमध्ये उपलब्ध असणारा पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये) 

२९ सप्टेंबर २०२३ – १४ लाख ३७ हजार ७१५

२९ सप्टेंबर २०२२ – १४ लाख २२ हजार ०९२

२९ सप्टेंबर २०२१ – १४ लाख ३२ हजार ३२८

हे ही वाचा:

जुन्नर मधून AJIT PAWAR यांना बसला दणका ; शरद पवारांच्या गटात सामील झाले ‘हे’ आमदार

VIDHANSABHA ELECTION मधील दोन निवडणूक चिन्ह गोठवली ; SHARAD PAWAR यांना मिळाला मोठा दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version