राज्यभरात सर्व जिह्ल्यात पावसाची दमदार हजेरी

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यभरात पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

राज्यभरात सर्व जिह्ल्यात पावसाची दमदार हजेरी

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यभरात पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पण मात्र आता पावसाने मुंबई, कोकणसह संपूर्ण राज्यभर हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील काही ठिकाणी मोठ्या स्वरूपात तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. पालघर, परभणी, नंदुरबार, हिंगोली, बुलढाणा, वर्धा, जळगाव, अहमदनगर या जिह्ल्यामध्ये देखील पावसाचे आगमन झाले आहे. सकाळपासून राज्यात पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. पाऊस पडत असल्यामुळे शेती पिकांना पाणी मिळणार आहे. मागच्या महिन्यात पाऊस न पडल्यामुळे पाण्याअभावी पीक कोमेजून गेली होती. पण आता त्यांना जीवदान मिळणार आहे.

अनेक दिवसांपासून शांत असलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. परभणी जिह्ल्यात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. कधी जोरदार तर कधी हळू अश्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. काही भागात रस्त्यावर पाणी साचले आहे. सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस पिकांसाठी चांगला असतो. मागच्या काही दिवसांपासून पाण्याअभावी पीक सुकून जात होती पण पावसाच्या पुन्हा झालेल्या आगमनामुळे या पिकांना जीवदान मिळणार आहे. पण अजूनही परभणी जिह्ल्यातील शेतकरी मोठ्या पावसाची वाट पाहत आहेत. बुलढाण्यात देखील पावसाने हाजरी लावली आहे. आज सकाळपासून बुलढाण्यात धुक्यांची चादर पसरली आहे. पालघर जिह्ल्यात जोरदार पाऊस पडत आहे. नंदुरबार मध्ये पण पावसाने हजेरी लावली आहे. कापूस आणि भात पिकांना पावसामुळे जीवदान मिळणार आहे. तसेच धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्यासाठी जोरदार पावसाची अपेक्षा आहे. परंतु आता काही अंशी शेतकरी वर्गाला पावसाच्या येण्याने सुख मिळाले आहे.

हिंगोलीमध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेती पिकांना पाणी मिळणार आहे. मागच्या महिन्यापासून शेतकरी पावसाची वाट पाहत होते. अखेर कालपासून हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. काही जिह्ल्यात पावसामुळे ढगळ वातावरण निर्माण झाले आहे. परंतु शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

Exit mobile version