राज्यात पावसाची दमदार हजेरी

सध्या संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकणी नद्या - नाल्यांने पूर देखील आले आहे. तर या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे.

राज्यात पावसाची दमदार हजेरी

मुंबई :- सध्या संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकणी नद्या – नाल्यांने पूर देखील आले आहे. तर या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना आणि हेती पिकांना देखील फटका बसला आहे. विदर्भासह पावसाने कोल्हापूर आणि पुणे येथे देखील दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान मुंबई आणि आसपासच्या परिसरात देखील तुफान पाऊस बरसत आहे.

महाराष्ट्रातील विदर्भ जिल्ह्यातील भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढले आहे. नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर भंडाऱ्यात पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील एकंदरीत पूर्व परिस्थिती जर बघितली तर काही प्रमाणात पुराच्या पाण्याच्या पातळीत घट झालेली आहे. संजय सरोरातील पाच दरवाजे उघडल्यामुळे ही स्थिती उद्भवली होती. मात्र आता दहा पैकी दहा गेट हे बंद आहे. मात्र गोसीखुर्द मधनं १६००० क्युसेस इतका विसर्ग सुरू असल्यामुळे पूर परिस्थिती आताही कायम आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील सतरा हून अधिक मुख्य आणि छोटे मार्ग अद्यापही बंद अवस्थेत आहे. त्याच बरोबर पुणेविभागात देखील पावसाने त्याची जोरदार हजेरी हि लावली आहे. तर पुणे जिल्ह्यात येल्लो अलर्ट हा देण्यात आला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही जोरदार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालं आहे. खडकवासाला धरणामध्ये पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून काळ संध्याकाळी २६ हजार ८०९ क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. मुसळधार पावसामुळे मुठा नदीला पूर आला. विशेष म्हणजे पूर आल्याने नदी पात्रातील भिडे पूलही पाण्याखाली गेला. भिडे पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे प्रचड हाल झाले. त्यासोबतच लोणावळ्यात (Lonavala) वरुणराजाने जोरदार हजेरी लावली आहे. नदी, नाले, धबधबे वाहू लागलेत, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. मात्र गेल्या २४ तासात दमदार पाऊस झाल्याने पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. धबधबे देखील पर्यटकांना आकर्षित करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी लोणावळ्यात अधिक पाऊस पडला आहे.

त्याचसोबत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरु आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी ४१ फुटांच्या पुढे गेली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ७४ बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ७ राज्य मार्गांवर पाणी आले आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख २४ मार्ग पाणी आल्याने बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ३१ मार्गांवर थेट संपर्क तुटल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. ७ राज्यमार्गांवर १२ ठिकाणी पाण्याने वेढा दिला आहे. प्रमुख २४ मार्गावर २६ ठिकाणी पाण्याचा विळखा आहे.

हे ही वाचा :-

विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावरून, महाविकास आघाडीत मतभेद

Exit mobile version