spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Heavy Rainfal : मुख्यमंत्र्यांनी पूरजन्य परिस्थितीचा घेतला आढावा

सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक जिल्हे, त्यातील नद्या, नाले हे दुथडीभरून वाहू लागले आहेत. त्यामुळे या सलग पावसाचा त्रास हा मुंबईकारांना भोगावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरु असलेल्या पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. राज्यात गुरुवारी सर्वत्र पावासाचा धुमाकूळ सुरु आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक शहरांमधील पाणी वस्त्यांमध्ये घुसले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यनमध्ये शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.

पुण्यात गेल्या २४ तासांपासून पावसाने हाहाकार (Pune rainfall) माजवला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या, पूरस्थिती निर्माण झाल्याच्या तर भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेत सर्व बचाव करणाऱ्या अधिकाऱ्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की काय म्हणाले ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. “सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल. पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि लष्कराचे कर्नल संदीप (Carnal Sandeep) यांच्याशी मी बोललो आहे. स्थानिक यंत्रणा, फायर ब्रिगेड देखील काम करत आहे. तसेच याआधीच त्यांनी एनडीआरफच्या बोटी वगैरे रवाना केल्या आहेत. आर्मीला देखील अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. लष्कर देखील आता पुण्यात पोहचते आहे. एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील आणि त्यांना एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता भासली तर तीही तयारी करणार आहे, बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाईल.” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

heavy rainfall : पावसाने पळवले मुंबईकरांच्या तोंडचे पाणी ; रेल्वे वाहतुकीवर झाला परीणाम

heavy rainfall : पावसामुळे नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी ; जनजीवन झाले विस्कळीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss