पुण्यासह कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

पुण्यासह कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

काही दिवसांपासून पुण्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली पण काल पासून पुण्यात जोरदार पावसाळा सुरवात झाली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी शहर आणि परिसरात जोरदार हजेरी लावली, कालप्रमाणे आज देखील शहरात विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. शहरातील अनेक भागांत २० मिनिटांत रस्त्यावर पाणी साचलेले होते. तर कोल्हापूर शहरामध्ये आज दुपारी वादळी वारे आणि मेघगर्जनेसह परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पंचमी दिवशी भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये सोयाबिन आणि भात मळणीला ऐन दसऱ्यामध्येच वेग आला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची धावपळ उडाली.

पुण्यात आज दुसऱ्या दिवशी सुद्धा पावसाने जोरदार बॅटिंग केळ्याचे दिसत आहेत. काही मिनिटे पडलेल्या पावसाने रस्त्यांना नद्यांचं सावरूप आले होते. तसेच काही ठिकाणी गारा पडण्याच्या देखील घटना घडल्या आहेत. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण दिसून आले दरम्यान दूपारनंतर पावसाला जोरदार सुरूवात झाल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापूरमध्ये सुद्धा आज वादळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. उजळाईवाडी ते शाहू जकात नाका ते टेंबलाई उड्डाण पूल मार्गावर जोरदार वार्‍याने अनेक झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. शिवाजी विद्यापीठ परिसरातही झाडे वाऱ्याने मोडली गेली. शहरातील शाहू मिल चौकातही झाड कोसळल्याची घटना घडली.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नाना पेठ, चमडी गल्ली या ठिकाणी जोरदार पावसात गाड्या पडून वाहून गेल्याचा प्रकार देखील घडला. यासोबतच शहरातील पेठांच्या भागात तसेच कर्वेनगर, सिंहगड रस्ता, शिवणे परिसरात मुसळधार पाऊस झाला. कोल्हापूरमध्ये गगनबावडा मार्गावरील दोनवडेत झाड कोसळल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे कोकणात जाणारी वाहतूक खोळंबली. या महाकाय झाड कोसळल्याने कोणतीही सुदैवाने जिवितहानी झाली नाही. हे वडाचे सव्वाशे वर्षांचे असल्याचे बोलले जाते. दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून साबळेवाडी-खुपिरे-दोनवडे-वाकरे मार्गे वाहतूक सुरु आहे.

 

हे ही वाचा:

‘कॅन्सर होऊनही नेतृत्वाने साधी चौकशी केली नाही’, यामिनी जाधवांचा उद्धव ठाकरेंवर निशाण

विजेता संघ होणार मालामाल, ICCकडून बक्षिसाची रक्कम जाहीर

Follow Us

 

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version