spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

राज्यभरात पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात देखील पाऊसाने जोर धरला असून गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊसाने झोडपले आहे.

मुंबई : राज्यभरात पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात देखील पाऊसाने जोर धरला (Heavy weather in Mumbai) असून गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊसाने झोडपले आहे. संपूर्ण कोकणात पुढील पाच दिवस अतिवृष्टीची इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबईतील कुर्ला-ठाणे आणि सीएसएमटी विभागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पाऊसात देखील मेन, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि बेलापूर-नेरुळ कॉरिडॉरवर लोकल वाहतूक सुरळीत आहे. तसेच कोकणात देखील चांगला पाऊस पडत (Heavy weather in Mumbai) असल्याचे चित्र दिसत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस आहे. पाऊसाचा जोर असा कायम राहिला तर पाणी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनान केले आहे.

तर राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस (Heavy weather in Mumbai) पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. शेतकरी संध्या पावसाची वाट बघत आहे.

हेही वाचा : 

शिंदेंचं असं भाषण मी पहिल्यांदा ऐकलं; अजित पवार म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकला

Latest Posts

Don't Miss