Helicopter Crash in Pune : ‘त्या’ हेलिकॉप्टर मधून उड्डाण करणार होते खासदार सुनील तटकरे, मुंबईला पोहोचण्यापूर्वीच दरीत कोसळलं…

Helicopter Crash in Pune : ‘त्या’ हेलिकॉप्टर मधून उड्डाण करणार होते खासदार सुनील तटकरे, मुंबईला पोहोचण्यापूर्वीच दरीत कोसळलं…

 

 

Pune Helicopter Crash : पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता उड्डाण घेतलं होतं. हे उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या दुर्घटनेत ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात धुक्याची चादर पसरली आहे. या धुक्यामुळेच हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. या घटनेचा एक व्हि़डीओही समोर आला आहे. या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून खासदार सुनील तटकरे प्रवास करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Exit mobile version