Helicopter Crash in Pune : ‘त्या’ हेलिकॉप्टर मधून उड्डाण करणार होते खासदार सुनील तटकरे, मुंबईला पोहोचण्यापूर्वीच दरीत कोसळलं…

पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता उड्डाण घेतलं होतं.

Helicopter Crash in Pune : ‘त्या’ हेलिकॉप्टर मधून उड्डाण करणार होते खासदार सुनील तटकरे, मुंबईला पोहोचण्यापूर्वीच दरीत कोसळलं…

Pune Helicopter Crash : पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता उड्डाण घेतलं होतं. हे उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या दुर्घटनेत ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात धुक्याची चादर पसरली आहे. या धुक्यामुळेच हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. या घटनेचा एक व्हि़डीओही समोर आला आहे. या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून खासदार सुनील तटकरे प्रवास करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात अपघात झालेले हे हेलिकॉप्टर अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. सुनील तटकरे यांनी मंगळवारी ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या याच हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. विशेष म्हणजे सुनील तटकरे हे काल या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते आणि त्यानंतर ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. यानंतर सुनील तटकरे हे हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून मुंबईला रवाना झाले.

यानंतर आज सकाळी हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना नेण्यासाठी पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र त्यापूर्वीच या हेलिकॉप्टरला अपघात झाला. सुनील तटकरे हे याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. त्यासाठी या हेलिकॉप्टरने ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन उड्डाण केले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. मात्र, त्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले. ऑगस्टा १०९ असे या हेलिकॉप्टरचे नाव होते. हेलिकॉप्टरध्ये असलेल्या वैमानिकांची ओळख पटली आहे. कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत सिंग अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. तर मृत अभियंत्याचे नाव प्रीतम भारद्वाज असे आहे. हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर इंजिनाने पेट घेतला होता. त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे तुकडे झाले होते. उड्डाण झाल्यानंतर हेलिकॉप्टर पाच मिनिटांतच कोसळले.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे गटाने विरोधकांना डिवचलं, बाप को हात लगानेसे पहले…

‘मुंबईत हायअलर्ट’? दहशतवादी मोठ्या हल्ल्याची भीती, पोलीस ऍक्शन मोडवर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version