दुचाकी चालकांनो सावधान! आजपासून ‘या’ शहरात हेल्मेटसक्ती, नियमांचा भंग केल्यास दंडात्मक कारवाई

दुचाकी चालकांनो सावधान! आजपासून ‘या’ शहरात हेल्मेटसक्ती, नियमांचा भंग केल्यास दंडात्मक कारवाई

नाशिक शहर वाहतूक पोलिस शाखेकडून आज गुरुवार दिनांक ०१ डिसेंबर पासून आयुक्तालय हद्दीमध्ये पुन्हा हेल्मेटसक्तीची (Helmet compulsory) कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे. आठवडाभरापूर्वीच पोलिस आयुक्त (Commissioner of Police) जयंत नाईकनवरे यांनी हेल्मेट सक्तीसंदर्भातील फर्मान जारी केले होते. त्यामुळे दुचाकी चालकांना दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे. दरम्यान, या वेळी मुंबईच्या धर्तीवर सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर करण्याचे संकेत देत ‘स्पेशल ड्राईव्ह’ उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी वाहतूक पोलिस शाखेकडून करण्यात आलेली आहे.

हेही वाचा : 

Carrot योग्य प्रमाणात पोषक तत्वे मिळविण्यासाठी हिवाळ्यात खा ‘गाजर’

नाशिक पोलिसांकडून (Helmet compulsory in nashik ) शहरातील चेकिंग पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. आज शहरातील स्वामीनारायण चौक, संतोष टी पॉईंट, एबीबी सर्कल, अशोक स्तंभ, गरवारे पॉईंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक, बिटको कॉलेजसमोर चेकिंग होणार आहे. सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी ५ वाजल्यापासून ७ वाजेपर्यंत गाड्यांची चेकिंग होणार आहे.

Womens Health Tips बाळंतपणानंतर सुटलेले पोट कमी कसे करावे ?

नाशिक शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पोलिसांनी राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्गावर गस्त वाढवली असता अपघातांमध्ये बऱ्यापैकी घट झाल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी देखील हेल्मेट वापराबद्दल पोलीस आयुक्तालयामध्ये वेळोवेळी मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. त्या त्या वेळी अपघातांच्या संख्येमध्ये व गंभीर दुखापतीमध्ये घट झाल्याचे आढळून आले आहे. दुचाकी चालकांचे होणारे अपघात व त्यामध्ये होणारे प्राणहानी गंभीर (Road accident) जखमा व त्यामुळे येणाऱ्या अपंगत्व या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्या विरुद्ध पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. नाशिक शहरातील सर्व दुचाकीधारकांनी योग्य प्रतीचे हेल्मेट वापरून आपल्या दुचाकी वाहन चालवावे व वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस विभाग विभागाकडून करण्यात आले आहे.

अनेकांना रडवणाऱ्या कांद्याचे आणि त्याच्या रसाचे फायदे माहीत आहेत का ?

Exit mobile version