spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोरदार तडाखा; शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने चांगलाच जोर धरला असून हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे अनेक भागामध्ये जलमय स्थिती झाली असून नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. तर अनेक ठिकाणी शेतीला पावसाचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे जमीनदोस्त झाले आहे. अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाच्या सक्रियतेमुळे राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. विदर्भासह मराठवाड्यात पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. हवामान विभागाकडून आजदेखील विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलं आहे. तसेच नागरिकांना योग्य ती खबरदारी घराण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

धुळे तालुक्यात प्रचंड पाऊस, शेतकऱ्यांच नुकसान

धुळे तालुक्यातील तांडा कुंडाणे आणि बोरी परिसरात पाऊसाचा रौद्र रूप पाहायला मिळत आहे. मुकटी मंडळात तर पाऊस उसंत द्यायला तयार नाही. त्यामुळे या भागात पिकांच काय तर शेतातील मातीही वाहून गेली आहे. शेतात साचलेले पाणी, खंगाळलेल्या जमिनी, आडवी पडलेली नवतीची पिके, फुटलेले बांध या मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. धुळे तालुक्यातील मुकटी मंडळात यंदा तीनदा अतिवृष्टी झाली. त्यात बहुतांशी क्षेत्रावरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर शेतातील मातीही वाहून गेल्याने जमिनीचा पोतही खराब झाला आहे. यापूर्वी झालेल्या ढगफुटीनंतर प्रशासनाने बाधित क्षेत्राचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, बोरी परिसरात कुंदाने वेल्हाने, तांडा कुंडाणे येथील शेतकरी वर्गातून होत आहे. मुकटी मंडळात सातत्याने पाऊस होत आहे. त्यात ढगफुटी आणि अतिवृष्टीने कहर केला आहे. शेतकरी बाळू पवार यांच्या 5 एकर शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेला, त्यावर झालेला खर्चही वाया गेला. त्यामुळे प्रशासनाने आता पंचनाम्यात वेळ खर्च न करता शक्य तेवढ्या लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. अशी मागणी आता शेतकरी व्यक्त करीत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी एसडीआरएफचे पथक दाखल

यवतमाळ जिल्ह्यात १३ तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नदी नाल्याचे पाणी अनेक गावातील नागरिकांच्या घरात शिरले आहे. पुन्हा पाऊस आल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी एसडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. यात अधिकारी आणि अंमलदार अशा एकूण 32 जणांचा यात समावेश आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी यवतमाळ जिल्ह्यात एसडीआरएफचे पथक प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेऊन आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. यवतमाळ जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडतो आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १३ तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने घरे, शेती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच जनावरे देखील वाहून गेली आहेत. शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिके पाण्याखाली गेली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पिकं त्यांच्या डोळ्यादेखत जमीनदोस्त झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. उमरखेड, महागाव, पुसद या तालुक्याला पावसाने झोडपून काढले. नदी-नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने पिकांना फटका बसला आहे. हाता तोडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तत्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी तथा शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.

बार्शी तालुक्यात जोरदार पावसामुळे चादणी नदीवरील धाराशिव – सोलापूर पुलाला तडे

आगळगाव परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे चांदणी नदी काठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून सलग दोन दिवस सुरु असणाऱ्या पावसामुळे चादणी नदीवरील पुलाला तडे पडले आहेत. धाराशिव – सोलापूर जोडणारा हा पूल असल्याने दोन्ही जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला आहे.

नांदेडमध्ये मुसळधार पाऊस सुरूच, शेतजमीन खरडून गेली, खरीप पिकांचे नुकसान

नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनावरांचा मृत्यू झाला आहे तर अनेक घरांची पडझड झाली आहे. किनवट, माहूर तालुक्यात सर्वाधिक पावसाचा फटका बसला आहे. शेतजमीन खरडून गेल्याने खरीप हंगामातील पिके उध्वस्त झाली आहेत.

नांदेड शहरासह जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. नांदेड शहरातील सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणीसाठलं आहे. गोकुळ नगर, विष्णुनगर, हमालपुरा आदी भागात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतो. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य पाण्यात भिजले आहे. घरात पाणी असल्याने लोकांचे हाल होत आहेत, स्वयंपाकही करता येत नाही जीव मुठीत धरून लोक पाऊस उघडायची वाट बघत आहेत.

सोलापूर शहर आणि परिसरात मागच्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस

सतत सुरु असलेल्या पावसामुळे सोलापूर शहरवासीय हैराण झाले असून काल सोलापुरात २१ मिमी पावसाची झाली नोंद झाली. सोलापुरात हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला होता. सोलापुरात हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला,मात्र संततधार पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडायला मुभा मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

हे ही वाचा:

नेहरूंपर्यंत का जाता? माफी तुम्ही, BJP ने मागायला हवी.. Devendra Fadnvis यांच्या वक्तव्यावर Ambadas Danve आक्रमक

महाराजांबद्दल शंका का निर्माण करता? एवढा राग का व कश्यासाठी? सुरत लुटीबद्दलच्या Devendra Fadnavis यांच्या वक्तव्यावर Jitendra Awhad आक्रमक

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss