सामन्यांच्या खिशाला फटका; एसटीचा प्रवास महागणार

सामन्यांच्या खिशाला फटका; एसटीचा प्रवास महागणार

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एसटीने बस प्रवासाच्या दारात मोठी वाढ केली आहे. एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात ५ ते ७५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गावी जाणाऱ्या सामान्य प्रवाश्यांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे. महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याच महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. २० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या दरम्यान, केवळ दिवाळीच्या कालावधीसाठी एसटी प्रवास भाडेवाढ करण्यात येणार आहे. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.

दिवाळीच्या सणानिमीत्त एसटी महामंडळाकडून बस तिकीटांचे दर वाढवण्यात आले आहेत, ही दरवाढ आज जाहीर करण्यात आली असून मागच्या काही दिवसात एसटीचे झालेले नुकसान भरून काढण्याकरिता हा हंगामी निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. २० ऑक्टोबर रात्री १२ वाजल्यापासून ही भाडेवाढ राज्यभर लागू होणार आहे. एसटीने ५ ते ७४ रुपयांपर्यंतची दरवाढ केली असून दादर-स्वारगेट मार्गावर सध्या २२५ रुपये दर आहे तो या काळात २६० रुपये असणार आहे. तर शिवशाही गाडीसाठी ३५० असलेल्या दरात ३८५ रुपये इतकी वाढ केली जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे त्या प्रवाशांकडून आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेबरपासून भाडेवाढ संपुष्टात येईल आणि नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

Mumbai Police : आता कारमध्ये सीट बेल्ट नसल्यास होणार कडक कारवाई

शी जिनपिंगची राजवट संपणार? शी जिनपिंगविरुद्ध चीनी जनतेने पुकारला बंड, कम्युनिस्ट राजवटीत लोकांचा विरोध…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version