वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात, मेळाव्यासाठी जाणाऱ्या गाड्यांचा अपघात ५ ठार

वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात, मेळाव्यासाठी जाणाऱ्या गाड्यांचा अपघात ५ ठार

वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला आहे. या अपघतात पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्य मार्गावर हा अपघात झाला आहे. एका मागून एक गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. वरळीहून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. या अपघातात एकून ५ गाड्यांचे नुकसान झाले आहे. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून दसरा मेळाव्यासाठी आलेल्या गाड्यांना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

वरळी सी लिकवर थांबण्यास मनाई असतानाही काही गाड्या या ५ ऑक्टोबर रोजी सी लिंकवर थांबल्या होत्या. त्यावेळी मागू वेगात आलेल्या वाहनांने उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. हा संपूर्ण अपघात सी.सी.टी.वि मध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर वायरल होत आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक आले असताना पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतुकीतही बदल करण्यात आले आहे. तर बंदी असताना वाहने घातल्याने हा अपघात झाला आहे.

अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला मागून येणाऱ्या तीन गाड्या रुग्णवाहिकेला आणि अपघातग्रस्त गाडीली धडकल्या. गाड्या एका पाठोपाठ आदळल्याने वाहनांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर वरळी सी लिंकवर मोठा गोंधळ उडाला. या अपघातात जखमी झालेल्या चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताचा तपास पोलिस करत आहे.

हे ही वाचा:

दसरा मेळाव्यामुळे वाहतुकीत बदल; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

सुका खोकला दूर करण्यासाठी करा रामबाण उपाय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version