या सोहळ्यांना मी इथे मुख्यमंत्री म्हणून आलो नाही – एकनाथ शिंदे

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आणि या सोहळ्याला देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यांना मी इथे मुख्यमंत्री म्हणून आलो नाही – एकनाथ शिंदे

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आणि या सोहळ्याला देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली. तसेच, या कार्यक्रमासाठी अनेक श्री सदस्यांनी उपस्थिती लावली. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी इथे मुख्यमंत्री म्हणून आलो नाही तर मी आपल्या परिवारातला सदस्य म्हणून या ठिकाणी उभा आहे. महाराष्ट्र राज्याचा सर्वाच्च असा मनाचा हा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार अप्पासाहेबांना गृहमंत्री महोदयांनी अर्पण केला. मी अप्पासाहेबांना या राज्यामध्ये साडेबारा कोटी जनतेच्या वतीने धन्यवाद देतो त्यांचे मनापासून अभिनंदन करतो असे ममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी राजकीय सत्तेपेक्षा अध्यात्मिक शक्ती मोठी असते असे त्यांनी स्पष्ट केलं आहे. जेव्हा सूर्य आग ओकत असताना एकही माणूस जाग्यावरुन उठत नाही हे आप्पासाहेबांचे आशिर्वाद आहेत. शिस्तीचे पालन सर्व सदस्य करत आहेत. माझी पत्नी आणि मुलगा श्रीकांत समोर बसला आहे. लहान मोठा कोणी नाहीये इथे सगळे सदस्य म्हणून समोर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अप्पासाहेबांची जादू पाहण्याच भाग्य आम्हाला लाभले आहे. राजकीय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी, त्याच उदाहरण आपण पाहत आहोत. आजच्या कार्यक्रमाचा रेकॉर्ड आप्पासाहेबांचे सदस्यच मोडू शकतात आणि या महासागरामध्ये तुमच्या देव दिसत आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

खऱ्या अर्थाने जगामध्ये श्रीमंत कोणी असाल तर ते तुम्ही आहात. खरी श्रीमंती ही संस्कारांमध्ये आहे ही श्रीमंती परिवारामध्ये अनुभवायला मिळते कारण नानासाहेब आणि आप्पासाहेब यांच्या विचाराची श्रीमंती घेऊन तुम्ही जीवनामध्ये जगात आहात सोहळ्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढे ते म्हणाले की, मला वाटतं ज तुमच्यापेक्षा श्रीमंत दुसरे कोणीच या ठिकाणी असू शकत नाही. ज्या प्रकारे आदरणीय आपासाहेबांनी निरूपणाच्या माध्यमातून आपल्या सर्वाना एक सकारात्मकता दिली आहे, ती कौतुकास्पद आहे. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करून आम्ही धान्य झालो आहोत असे उपमुख्यमंत्री म्हणाले. इथे जमलेले लोक जगामधील आठव आश्चर्य आहे. कपडे खराब झाले तर धुवता येतात पण मन स्वच्छ कसं करायचे हे मन स्वच्छ करण्याचे रसायन आहे जी कला आबासाहेबांच्या शब्दांमध्ये असल्याचे जन्मशताब्दी वर्षांमध्ये हा पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे. याचा आनंद मला आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आपल्या घराण्याचा इतिहास साडेचारशे वर्षाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपले पूर्वज धर्मजागृतीचे काम करत आहेत. पिढ्यान पिढ्या चांगले काम आपल्या हातून होत असल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार ज्यावेळी आप्पासाहेबांना देत आहोत, त्यावेळी त्यांचे मोठे कार्य आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : 

५६ वर्ष ज्या घराण्यामध्ये तुम्ही जन्माला आले ते घर टिकवू शकले नाही, नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Exclusive : भाजपाला पोहोचायचं राज्यातल्या ३ कोटी कुटुंबात

Armaan Malik ने दिली खुशखबर, दुसरी पत्नी Kritika Malik बनली आई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version