मला सलाईनमधून विष देण्याचा डाव आहे म्हणून मी सलाईन घेणं बंद केलं; मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंतरवली सराटीमध्ये उपोषणासाठी बसले आहेत.

मला सलाईनमधून विष देण्याचा डाव आहे म्हणून मी सलाईन घेणं बंद केलं; मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंतरवली सराटीमध्ये उपोषणासाठी बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा १६ वा दिवस आहे. आज त्यांनी आंतरवलीमध्ये निर्णयक सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी जरांगेंनी मराठा बांधवांशी संवाद साधला. मनोज जरांगे म्हणाले, मला सलाईनमधून विष देण्याचा डाव आहे. म्हणून मी सलाईन घेणं बंद केलं आहे,माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, असे म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना आवाहन केले आहे.

देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांचा दरारा संपवायचा आहे. एकनाथ शिंदेचे माणसे आणि अजित दादांचे देखील दोन आमदार आहेत. त्याचा काही तरी गेम करावा लागेल किंवा याचे एन्काऊंटर करावे लागेल, असे देवेंद्र फडणवीसांचे षडयंत्र आहे. तुला माझा बळी पाहिजे तर मी सागर बंगल्यावर येतो, असे जरांगे म्हणाले. बारसकर हा देवेंद्र फडणवीस यांनी उभा केलेला माणूस आहे. मीडियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे काम फक्त देवेंद्र फडणवीस करत आहेत. गुलाल उधळला नाही, त्यामुळे यांचा अपमान आहे. त्याच्या डोक्यात मी ब्राम्हण त्या मराठ्यांना हरवुन दाखवू, असे आहे. ज्याचे ऐकले नाही त्याला संपवतो. देवेंद्र फडणवीस म्हटले तर नारायण राणे काही करू शकत नाहीत. एकनाथ शिंदेला काहीच करू देत नाहीत,असे मनोज जरांगे म्हणाले.

छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला काहीच मदत मिळत नाही. मराठ्यांना संपवण्याचा कुणाचा तरी डाव रचत आहे. यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे हे मी इथे स्पष्ट सांगतो. मराठ्यांना-मराठ्यांच्या हातूनच हरवण्याचा त्यांचा डाव आहे. माझ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारी शोधल्या जात आहेत. संपूर्ण राज्यात माझ्या विरोधात छेडछाड, विनयभंगबाबत एकही तक्रार असल्यास जे करायला सांगाल ते करायला तयार आहे. एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात तुम्ही हात घालू शकत नाही. फडणवीस तू माझा बळी घेणार असेल तर उपोषण करून मरण्यापेक्षा तुझ्या दारात मरतो. तू गनिमा कावा करत असशील तर तुला आयुष्यातून उठवणार, असे मनोज जरांगे म्हणाले.

हे ही वाचा:

PM Modi पोहोचले समुद्रात बुडालेल्या द्वारका शहरात, पूजा केली आणि म्हणाले…

दीपक केसरकर म्हणाले, कोकणातील फायटर नेत्याचा पराभव केल्याचं आजही दुःख…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version