spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राकेश झुनझुनवाला यांच्या शेवटच्या निर्णयावर अंमलबजावणी

भारतीय शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला (Big Bull Rakesh Jhunjhunwala ) यांचे रविवारी निधन झाले परंतु त्यांच्या निधनानंतर RARE Enterprises या त्यांच्या कंपनीने त्यांनी घेतलेल्या शेवटच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे.

भारतीय शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला (Big Bull Rakesh Jhunjhunwala ) यांचे रविवारी निधन झाले परंतु त्यांच्या निधनानंतर RARE Enterprises या त्यांच्या कंपनीने त्यांनी घेतलेल्या शेवटच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Last Investment) यांच्या कंपनीने आज मंगळवारी बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा Singer India कंपनीत १० टक्के खरेदी केले आहेत.

Rare Enterprises ने Singer India मध्ये १० टक्के भागिदारी खरेदी केली आहे. Rare Enterprises ने बल्क डीलमध्ये व्यवहार केल्यानंतर शेअर दरात मोठी उसळण दिसून आली. या व्यवहारानंतर आज Singer India चा प्रति शेअर दर ६९.१५ रुपये इतका झाला. आज शेअर दरात अप्पर सर्किट लागला. शुक्रवारी १२ ऑगस्ट रोजी शेअर दर ५७.६५ रुपयांवर बंद झाला. राकेश झुनझुनवाला यांनी मागील आठवड्यात Singer India कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यापूर्वीच रविवारी १४ ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. सोमवारी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजार बंद होता. मंगळवारी शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर Rare Enterprises ने सकाळीच Singer India मध्ये बल्क डीलमध्ये १० टक्के शेअर खरेदी केले. त्यामुळे Singer India मध्ये गुंतवणूक करत Rare Enterprises ने राकेश झुनझुनवाला यांची शेवटची इच्छा पूर्ण केली.

दरम्यान, आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ४०० अंकांची वाढ झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये १३३ अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज ०.६७ टक्क्यांची वाढ होऊन ५९,८६३ अंकावर पोहोचला. तर निफ्टीमध्ये ०.७६ टक्क्यांची वाढ होऊन तो १७,८३१ अंकावर पोहोचला. निफ्टी बँकच्या इंडेक्समध्येही आज २०७ अंकांची वाढ होऊन तो ३९,२४९ अंकांवर पोहोचला.

 

हे ही वाचा :-

हॅलो ऐवजी भाजपच्या ‘वंदे मातरम्’नंतर, आता काँग्रेसचं ‘जय बळीराजा’

एकनाथ शिंदेंचं ठाकरेंच्या शिवसेनेला पत्र

 

Latest Posts

Don't Miss