गोंदियामध्ये आदिवासी आश्रमशाळेचा हलगर्जीपणा उघडकीस

एका ट्रकमध्ये इतक्या विद्यार्थ्यांना कोंबल्याने श्वास गुदमरुन काही विद्यार्थी बेशुद्ध झाले आहेत.

गोंदियामध्ये आदिवासी आश्रमशाळेचा हलगर्जीपणा उघडकीस

ग्रामीण तसेच शहरी भागातील शाळांचा भोंगळ कारभाराबाबतच्या अनेक बातम्या सतत समोर येत असतात. शाळांच्या या भोंगळ कारभारामुळे अनेकदा विद्यार्थ्यांच्या जीवावर देखील बेततं आणि असाच विध्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणारा प्रकार गोंदियात घडला आहे. गोंदियामध्ये एका ट्रकमध्ये अगदी जनावरांना भरतात तसं शाळेतील विद्यार्थ्यांना कोंबून भरून प्रवास केल्याचं उघड झालं आहे. यामुळे श्वास गुदमरल्यानं १२० मुलं बेशुद्ध झाली आहेत

गोंदियाच्या मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील १२० विद्यार्थ्यांना एका ट्रकमध्ये कोंबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका ट्रकमध्ये इतक्या विद्यार्थ्यांना कोंबल्याने श्वास गुदमरुन काही विद्यार्थी बेशुद्ध झाले आहेत. या विद्यार्थ्यांना एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. एका विद्यार्थिनीला गोंदियाच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांना कोयलारी आश्रमशाळेत खेळण्यासाठी ट्रकमधून नेण्यात आलं. कोयलारी इथून परतत असताना विद्यार्थी बेशुद्ध झाल्याचं समोर आलं आहे.

गोंदियात घडलेल्या या घटनेबाबत अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच गोंदियात घडलेल्या या घटनेसारख्या अनेक घटना वारंवार घडत असल्याने शासनाने याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.

हे ही वाचा:

Navratri 2022 : नवरात्रीमध्ये उपवास करताना “या” गोष्टी ठेवा लक्षात

अमरावतीत बालकांच्या ICU मध्ये लागली अचानक आग, दोन बालके जखमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version