हिंगोलीमध्ये शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

हिंगोलीमध्ये शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

काही दिवसांपूर्वी मुसळधार पावासामुळं राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचे समोर येत आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी देखील पूर्ण नापीक झाली आहे. अतिवृष्टीचा मोठा फटका हिंगोली शहराला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. राज्य शासनानं नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत देण्याचं जाहीर केलं होतं. पण हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना मदतीपासून वंचित रहावं लागलं आहे. त्यामुळे गोरेगाव येथील शेतकरी ६ दिवसांच्या संपावर जाण्याची घोषणा केली आहे. आज संपावर असेलेले शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र मधल्या शेतकऱ्यांचे मोठ नुकसानझाले आहे. या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाच्या वतीने हेक्टरी १३ हजार ५०० रुपये मदत जाहीर करण्यात आली होती. परंतू या मदतीपासून सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना वंचित रहावे लागत आहे. या भागामध्ये अतिवृष्टी झाली नसल्याने पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अजब दावा प्रशासनाकडून केला जात आहे . त्यामुळं या भागातील जवळपास ४० ते ४५ गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावं लागत आहे. त्यामुळं गोरेगावमधील शेतकरी आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आज शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध फेकत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला.

दुभाजकावर गाढ झोपेत असलेल्या चौघांचा भरधाव ट्रकने चिरडलं

राज्यात सरासरी या वर्षी अधिक पाऊस पढल्याचे समोर येत आहे. या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला याचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतात पाणी साचून राहिल्यानं पिकं वाया गेली आहेत. हिंगोली मधल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई राज्य सरकारे द्यावी ही मागणी आहे.

हे ही वाचा:

प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

लालबागचा राजा मंडळाला मुंबई महापालिकेचा दणका, साडेतीन लाखांचा दंड आकारला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version