spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोल्हापूरमध्ये गणेशोत्सवाच्या महाप्रसादाच्यावेळी शुल्लक कारणावरून झाला गोळीबार

या हाणामारीत 5 जण जखमी झाले आहेत

गणेशोत्सवाच्या शुभ प्रसंगी कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापुरात सुरु असणाऱ्या गणेशोत्सवानिमित्तच्या एका महाप्रसादाच्या कार्यक्रमात गोळीबार (Firing) केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील मांडरे गावात घडली आहे.जेवणाच्या पंगतीत पिण्याचे पाणी देण्याच्या एका शुल्लक कारणावरून हा वाद (Dispute) झाला. या हाणामारीत गोळीबार करण्यात आलं ज्यात 5 जण जखमी (Injured) झाले आहेत. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या 12 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर 10 जणांना अटक करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील मांडरे गावात गणेशोत्सवनिमित्त महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. महाप्रसादाच्या पंगतीत अगरबत्ती लावत हातावरुन पाणी सोडून जेवायला सुरुवातत करण्याची परंपरा आहे. याच पाणी सोडण्यावरुन मानपानाचे नाट्य रंगले आणि दोन गटात हाणामारी झाली.

यावेळी एकाने गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी काठ्या, दगडाने जोरदार हाणामारी केली. या हाणामारीत 5 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी करवीर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उदय पाटील, संग्राम पाटील, रंगराव पाटील, अनिल पाटील आणि रोहित पाटील अशी हाणामारीत जखमी झालेल्यांची नावे आहेत.

केरळमधील घटना…

या पूर्वीसुद्धा केरळमधील लग्नसमारंभात अशीच एका शुल्लक कारणावरून हाणामारी झाली होती. केरळमधील अलप्पुझा येथे एका लग्नात पापडावरून जोरदार भांडण झाले होते ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. वृत्तानुसार, लग्नाच्या मेजवानीत पाहुण्यांना पापड न देण्यावरून भांडण व हाणामारीत झाली होती.

या भांडणात सहा जण जखमी झाल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले होते . वराच्या कुटुंबातील काही सदस्यांनी अतिरिक्त ‘पापड’ मागितल्यावर हाणामारी सुरू झाली, परंतु त्यांना नकार देण्यात आला, ज्यामुळे शाब्दिक बाचाबाची झाली.भांडण खूप वेगाने वाढले कारण व्हायरल व्हिडिओमध्ये लोक एकमेकांना बूट आणि चप्पल मारताना दिसत होते. नंतर, लोकांनी एकमेकांवर हल्ला करण्यासाठी खुर्च्या आणि टेबलचा वापर केला.

हे ही वाचा:

पुढचे काही दिवस पुणे तापणार; उष्णतावाढीबद्दल हवामान विभागाने केला अंदाज व्यक्त

दसरा मेळाव्याच्या वादात शरद पवारांची घेतली उडी, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss