spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्रात सर्वत्र विसर्जनाचा जल्लोष मात्र अपघाताच्या घटनांमुळे लागतंय विसर्जनाला गालबोट

महाराष्ट्राच्या विविध भागातून काही भावीक विसर्जनाच्यावेळी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या कानावर येत आहेत.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्यावर्षी लवकर या!, असा नाद सर्वत्र होत आहे. अनंताचतुर्दशीच्या मुहूर्तावर सगळीकडेच जल्लोषाचे वातावरण आहे. राज्यभरात गणपती विसर्जनच्या मिरवणुका सुरु आहेत. दहा दिवसाच्या गणपतीला देशभरात आज वाजत गाजत निरोप दिला जात आहे. शुक्रवारी सकाळपासूनच राज्यभरात बाप्पाच्या मिरवणूका निघत आहेत. सगळीकडे काहीसे आनंदाचे तर बाप्पा जाणार काहीसे उदासीचे देखील वातावरण आहे आणि आता अशातच महाराष्ट्राच्या विविध भागातून काही भावीक विसर्जनाच्यावेळी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या कानावर येत आहेत.

तलावातील गाळात रूतल्याने युवकाचा बुडून मृत्यू

नांदेड जिल्ह्यात गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. कुठे पारंपरिक ढोलताशात विसर्जन होतंय तर कुठे डॉल्बीच्या तालावर विसर्जन मिरवणूक सुरू आहे. अशात नांदेडमध्ये मात्र विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. नांदेडमध्ये गणेश विसर्जनाला तलावात उतरलेल्या एका युवकांचा मृत्यू झाला आहे. नायगांव तालुक्यातील भोपाळा गावातील ही घटना आहे. वीस वर्षीय शिवकुमार हत्तीनगरे हा गणपती विसर्जनासाठी तलावात उतरला असताना गाळात रुतल्याने त्याचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी एकत्र येत शिवकुमारचा मृतदेह तलावाच्या बाहेर काढला. या घटनेने भोपाळा गावावर शोककळा पसरली आहे.

धुळ्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू

धुळ्यात सुद्धा विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याचा प्रकार समोर आला आहे. धुळ्यात गणेश विसर्जन दरम्यान एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राकेश आव्हाड असे तरुणाचे नाव आहे. धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावात ही घटना घडली. गणपती विसर्जन दरम्यान राकेशचा पाय घसरून नदीत पडल्याने दुर्देवी घटना घडल्याचं समोर आलं आहे.

मुंबईत बाप्पाचा विसर्जन सोहळा जल्लोषात सुरु

तब्बल १० दिवसांच्या मुक्कामानंतर बाप्पा आता भक्तांचा निरोप घेत आहे. सर्वत्र बापाच्या विसर्जनचा सोहळा मोठ्या उत्साहात सुरु आहे. मुंबईत तर एकीकडे डीजेच्या रिदमवर, तर दुसरीकडे ढोल – ताश्यांच्या तालावर अनेकांनी ठेका धरला आहे. मुंबईमध्ये बहुतेक सर्व बड्या गणेश मंडळाच्या गणपतींचं आज विसर्जन होईल. लालबाग, परळ सारख्या मोठी गणेश मंडळ असणाऱ्या भागात आज वेगळंच वातावरण पाहायला मिळतंय. दोन वर्षानंतर कोरोनाचं विघ्न दूर झाल्यामुळे यंदा गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे.

हे ही वाचा:

ताडदेवचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

माझगावच्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत माजी मंत्री छगन भुजबळ सहकुटुंब सहभागी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss