पंढरपुरात 40 वारकऱ्यांना विठ्ठल आश्रमातील अन्नामुळे झाली विषबाधा

जवळपास ३० ते ३२ जणांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पंढरपुरात 40 वारकऱ्यांना विठ्ठल आश्रमातील अन्नामुळे झाली विषबाधा

सोलापूर : पंढरपूरमध्ये जेवणातून वारकऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. दुपारी कोबीची भाजी, बेसन, चपात्या आणि बासुंदी हे जेवण जेवल्यानंतर, संध्याकाळी वारकऱ्यांना उलटी, पोटदुखी, जुलाब समस्या जाणवू लागल्या. संबंधित घटना विठ्ठल आश्रमात घडली असून, जवळपास शंभर भाविक रविवारी दुपारी विठ्ठल आश्रमात जेवले असल्याचे समोर येत आहे. या प्रकारात चाळीस वारकऱ्यांना विषबाधा झाली असून यामध्ये वय वर्ष तीस ते पस्तीस असणाऱ्या वारकऱ्यांचा व काही बालकांचा देखील समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न

रविवारी संध्याकाळी सर्व वारकऱ्यांना हा त्रास जाणवू लागला आणि त्यामुळे जवळपास ३० ते ३२ जणांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. यामधील १० ते १५ जणांना रात्री अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अरविंद गिराम यांनी दिली आहे.

हेही वाचा

शिंदे गटाच्या १६ आमदारांवर आज होणार सुनावणी

श्री विठ्ठल आश्रमात आलेले हे भाविक हे पळसगाव, निमगाव, हळेगाव, वैजापूर, तळोशी, ढाणगाव दौंड, परभणी, कोल्हापूर, शेळवे पंढरपूर, पाटणे, जालना, सिंदखेड, सावरखेड, नाशिक, ढवळगाव, कोपरगाव, जालना, पैठण, दौंड येथून ह्या ठिकाणाहून आले होते. यातील प्रदीप विठ्ठल शिरोळे, सुदर्शन सगळे, ओंकार निर्मले, प्रणव शिंदे, पवन सुलतानी, दर्शन जाधव, गोरख जयभद्र, विनायक नाडे, वैभव कुंभार, आदिनाथ मालकर, केशव पवार, अभिजीत शिंदे, लक्ष्मण फुके, ऋषिकेश कोल्हे, नितीन गव्हाड, ऋषिकेश तांबे, अर्जुन पवार, गणेश राहणे, प्रताप गीते, ऋषिकेश चव्हाण, अभिषेक मोरे, करण परदेशी, स्वागत गाजरे, हरिशचंद्र लोखंडे, अतुल सुरवसे, वैभव शेटे, माऊली गवाड यांना उलट्यांचा होऊ लागला. सध्या काहींची प्रकृती स्थिर आहे. तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

Exit mobile version