जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणी पोलिसांना मोठे यश, २ आरोपींना करण्यात आली अटक

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या सुरू आहेत. राज्यातील राजकीय वातावरण आता दिवसेंदिवस आणखीनच तापत चालले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणी पोलिसांना मोठे यश, २ आरोपींना करण्यात आली अटक

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या सुरू आहेत. राज्यातील राजकीय वातावरण आता दिवसेंदिवस आणखीनच तापत चालले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष ऍक्शन मोड मध्ये आले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणातील स्तर हा आता हळू हळू खालवत चालला आहे. अश्यातच जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला हा करण्यात आला आहे. या हल्ला संदर्भात मोठी आणि महत्वाची अपडेट नुकतीच समोर आली आहे.

शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. डोंगरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. श्रावण दुबे असे एका आरोपीचे नाव आहे. ठाण्याहून मुंबईला परतत असताना आव्हाड यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी श्रावण गाडी चालवत होता. पोलिसांनी सांगितले की, जितेंद्र आव्हाडवर हल्ला करण्यापूर्वी श्रावणने आरोपीच्या गाडीचा पाठलाग केला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रावणला रायगड येथून अटक केली आहे. गुन्हे शाखेने आरोपींना डोंगरी पोलिसांच्या ताब्यात दिले असून शनिवारीच दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

१ ऑगस्ट रोजी जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला केला होता. या हल्ल्याच्या आरोपावरून संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव आणि अंकरीश कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी धनंजय राधव यांनी घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला. आव्हाड यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला असून त्यात त्यांच्या वाहनावर लाठीहल्ला होताना दिसत आहे. आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला झाला तेव्हा पोलिसांचे वाहनही आरोपींच्या मागे होते, असे असतानाही आव्हाड यांच्या वाहनावर तीन हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत दिलेल्या वक्तव्यावर नाराजी असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक, छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत दिलेल्या वक्तव्यामुळे स्वराज संघटना आव्हाड यांच्यावर नाराज आहे. आव्हाड यांनी माफी मागावी, अशी संघटनेची मागणी आहे.

हे ही वाचा:

Big Boss Marathi Season 5: योगिता चव्हाणच्या डोळ्यात आले पाणी ….कारण काय?

Uran Murder Case: आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी!

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version