Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Pune hit-and-run: अपघाताप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना केले मोठे आवाहन..

हा खटला आता फास्ट ट्रॅकवर चालवला जावा असे निर्देश देण्यात आले आहेत. पुणे पोर्शे हिट अँड रन अपघात प्रकरणामुळे पुणे पोलीस आणि प्रशासनावर देखील अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरच्या मुलानं भरधाव कारने दोघांना चिरडलं होतं.

ड्रंक अँड ड्राइव्ह (Drank And Drive) हे प्रकरण जसे गाजले तसेच पुणे पोर्शे कार (Porsche Car) प्रकरण मोठ्याप्रमाणावर गाजले. त्याचा परिणाम संपूर्ण पुण्यातील हॉटेल्स, बार आणि रेस्ट्रॉरंट इत्यादी क्षेत्रावर झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे मुंबई-पुण्याच्या ( Mumbai-Pune) हॉटेल्स, रेस्टोरंट यांच्यावर पोलिसांच्या धाडी पडल्या. अनेक गोष्टी यामुळे निदर्शनास आल्या.

देशभरात पुणे पोर्शे हिट अँड रन (Pune hit-and-run case) हे प्रकरण चांगलेच गाजले. याअंतर्गत पुण्यातील कल्याणीनगर भागात एका तरुणाने पोर्शे कारने दोन तरुणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकारणी आरोपासह त्याचा बचाव करणाऱ्या अन्य दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अशातच आता यासंदर्भात एक महत्वपूर्ण बातमी हाती अली आहे. या प्रकरणी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले आहे व त्यांना आर्थिक सहाय्य मिळेल असे आवाहन त्यांनी केले आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया (Om Prakash Awadhiya) आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा (Suresh Koshta) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या दोन्ही कुटुंबाचं सांत्वन केलं आहे. तसेच पुण्यात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून दोषींना लवकरात लवकर कठोर शासन कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मृत तरुण, तरुणीच्या पालकांना दिलं आहे.

यावेळी या दोन्ही मृत मुलांच्या कुटुंबीयांना पुन्हा सावरता यावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही कुटुंबाना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये मदत देण्याचा निर्णय देखील एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. याशिवाय पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या या घटनेनंतर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून कोणालाही पाठीशी घालू नये असे निर्देशमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांना दिले आहेत.  

हा खटला आता फास्ट ट्रॅकवर चालवला जावा असे निर्देश देण्यात आले आहेत. पुणे पोर्शे हिट अँड रन अपघात प्रकरणामुळे पुणे पोलीस आणि प्रशासनावर देखील अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरच्या मुलानं भरधाव कारने दोघांना चिरडलं होतं. या धक्कादायक अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता. मात्र या प्रकरणात दिवसेंदिवस अनेक धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे झाले होते. अशातच सध्या त्या धनिकपुत्राची रवानगी देखील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक बड्या लोकांची नावं समोर आली होती. या प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई आणि आजोबा अद्याप अटकेत आहेत. तर, त्याच्या वडिलांना काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला आहे. तसेच, या धक्कादायक प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून दोषींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी सरकार देखील पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं आहे. 

हे ही वाचा

वचन देते की, मी देशाच्या निस्वार्थ सेवेच्या….काय म्हणाल्या Varsha Gaikwad?

Chandrakant Patil यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Rohit Pawar आणि Amol Mitakari संतापून म्हणाले, दादा तुम्ही….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss