spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाताच्या प्रमाणात वाढ, काय आहेत अपघाताची नेमकी कारणं?

Accident Mumbai - Pune Expressway Maharashtra : मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि अपघात हे जणू काय नवीन समीकरणच बनला आहे. मागील काही दिवसांमध्ये या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

Accident Mumbai – Pune Expressway Maharashtra : मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि अपघात हे जणू काय नवीन समीकरणच बनला आहे. मागील काही दिवसांमध्ये या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सर्व सामान्य प्रवाशांसोबतच या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातात अभिनेते आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे, अभिनेत्री भक्ती बर्वे, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन झाल्याची दुर्देवी घटना घडल्या आहेत. सोबतच अभिनेत्री मलायका अरोरा, अभिनेत्री आणि माजी खासदार शबाना आझमी तसंच काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांचेदेखील अपघात झाले आहेत. त्यामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्ग अपघातांचा केंद्रबिंदू ठरतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळीच एका मागोमाग एक अशा ११ गाड्या एकमेकांना धडकल्या आणि मोठा अपघात झाला.

पुणे मुंबई द्रुतगती मार्ग हा सहा लेनचा महामार्ग आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीन व पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या तीन अशा एकूण सहा गाड्या एकाच वेळी या महामार्गावरून धावतात. प्रवेश नियंत्रित टोल असलेला हा भारतातील पहिला द्रुतगती मार्ग आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही महत्त्वपूर्ण शहरांना एकत्र जोडणारा महत्वपूर्ण असा हा महामार्ग आहे. या महामार्गामुळे दोन्ही शहरातील उद्योगधंद्यांना चालना मिळाली आहे. सोबतच प्रवाशांच्या वेळेची बचत या महामार्गामुळे होते.
एकूण ९४.५ किलोमीटरचा चा हा महामार्ग असून २००२ पासून हा मार्ग कार्यांन्वित झाला होता आणि प्रवाशांच्या सेवेत आला होता. हा महामार्ग बांधण्यासाठी 16.3 अब्ज रुपयांचा खर्च झाला होता. या मर्गावरील वेग मर्यादा 80 किलोमीटर इतका प्रतितास आहे.

मुंबई पुणे द्रुतगती महामामार्गावरील अपघाताची कारणं

– 2020 च्या अहवालानुसार वाहनांचा वेग हे अपघाताचं प्रमुख कारणं आहे.

– .लेन कटींग करणं आणि ओव्हरटेक करणं.

– या मार्गावर टायर फुटणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे

– रात्री आणि पहाटेच्या वेळी सर्वाधिक अपघात होतात.

महामामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी उपाय काय?

– .महामार्गावर थांबलेल्या वाहनांवर मागून येणारी वाहनं आदळू नयेत यासाठी बॅरिगेट्स लावण्याची गरज आहे.

– रिफ्लेक्टिव्ह आणि ब्लिंकर्स वाढवण्याची गरज आहे.

– या महामार्गावर घाट रस्ता आहे. याच घाट रस्त्यावर फॉग लाईट्स लावण्यात यावे

मुंबई पुणे द्रुतगती महामामार्गावर वाढणारी अपघाताची संख्या पाहता इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्याचा निर्णय रस्ते बांधकाम विभागाकडून घेण्यात आला आहे. ३४० कोटींचा हा एकूण प्रकल्प असणार आहे. .यातील ११५ कोटी उभारणीसाठी तर उर्वरित २२५ कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत. पुढील चार ते पाच महिन्यात या कामाला सुरुवात होणार आहे.

हे ही वाचा : 

“राज ठाकरे यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल”, अजित पवारांचे प्रत्युत्तर

वरळीच्या पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss