spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

परतीच्या पावसानं सामान्यांना दिला महागाईचा झटका! भाज्यांच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ

परतीच्या पावसाने यंदा दिवाळीपर्यंत राज्यातील अनेक भागात थैमान घातलं. या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतातील भाज्यांचंही यात मोठं नुकसान झालं आहे. भाज्या खराब झाल्याने आवक घटली आहे, याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक, पुणे, मुंबई आणि ठाण्यासह उपनगरातील बाजारांमध्ये भाज्यांचे दर तब्बल २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत.

भाजीपालाच्या दरात २० ते २५ टक्क्यांची वाढ

आठवड्यापूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. काढणीला आलेल्या भाज्या पूर्णपणे खराब झाल्या. त्यामुळे भाज्यांचे दर देखील कडाडले आहेत. भाज्यांची आवक २५ ते ३० टक्क्यांनी घटल्याचं चित्र आहे. परिणामी, भाजीपालाच्या दरात २० ते २५ टक्क्यांची वाढ बघायला मिळते आहे. बाजारात भाजीपाल्यांची आवक सुरळीत व्हायला साधारण एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत सर्वसामान्यांना भाजीपाला चढ्या दराने घ्यावा लागणार आहे.

हेही वाचा : 

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांनी विरोधात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा घेतला समाचार, म्हणाले जे लोक हँग झाले…

मुंबई, ठाणे आणि पुणे यासारख्या शहरांमध्ये गवार, फ्लावर, शिमला मिर्ची, भेंडी, कोबी, वांगी अशा भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तर भाज्यांची आवक २५ ते ३० टक्क्यांनी घटली आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात भाज्यांचं नुकसान झालं आहे. शेतात पाणी साचून दलदलीसारखी स्थिती असल्याने भाजीपाला सडलाही आहे आणि भाज्या काढण्यासही अडचणी येत आहेत.

गव्हार – १०० रुपये प्रति किलो, फुलकोबी – ६० रुपये प्रति किलो, पालक – ६० रुपये प्रति किलो, बीट – ६० रुपये प्रति किलो, कोथिंबीर – ५० रुपये गड्डी, कांदा पात – २५ रुपये गड्डी

Tata Airbus Project : प्रकल्प गुजरातला जातात, मात्र मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बघ्याच्या भूमिकेत ; जयंत पाटील

Latest Posts

Don't Miss