ST च्या फायद्यात वाढ, कोणत्या कारणांमुळे झाला एसटी महामंडळाचा नफा?

ST च्या फायद्यात वाढ, कोणत्या कारणांमुळे झाला एसटी महामंडळाचा नफा?

मागील अनेक वर्षांपासून तोट्यात असलेली एसटी (ST) आता लवकरच फायद्यात येण्याची शक्यता आहे. विविध सरकारी योजनांचा आधार घेत गेले अनेक वर्ष एसटी सेवा तोट्यात होती. एसटी महामंडळाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र आता एसटी महामंडळ ऑगस्ट (August) महिन्यात फायद्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जुलै (July) महिन्यात एसटी महामंडळाला 18 कोटींचा तोटा झाला होता ऑगस्ट महिन्यात कोणतेही मोठे सणवार नसूनही एसटी महामंडळाला 16 कोटी रुपयांचा फायदा मिळाला आहे.

2020 ते 22 या दोन वर्षात कोरोना (Corona) महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा दीर्घकालीन संप (ST Strike) यामुळे एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनले होते. 2022 च्या मे महिन्यापासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. राज्य शासनाकडून 75 वर्षांवरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासात तिकीटात 50 टक्के सवलत (Concession to Senior Citizens and Women’s for Ticket) या दोन योजना सुरू करण्यात आल्या. यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत बऱ्याच प्रमाणात वाढ झाली. याआधी 2015 मध्ये एसटी महामंडळ फायद्यात आले होते. त्यानंतर आता 2024 मध्ये ऑगस्ट महिन्यात एसटीने कमाई केली आहे.

एसटी प्रशासनाकडून मागील वर्षभरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान (Hinduhrudyasamrat Balasaheb Thackeray Clean Bus Station Mission) तसेच विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास (Pass for Students), प्रवासी राजा दिवस, कामगार पालक दिवस, श्रावणामध्ये एसटी संगे तिर्थाटन असे अनेक अभिनव राबवले होते. जे विभाग मागील अनेक वर्षांपासून तोट्यामध्ये आहेत, त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. स्थानिक पातळीवर आगार निहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठकासुद्धा घेण्यात आल्या होत्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळवण्यात आल्यामुळे एसटी (ST) आता फायद्यात असल्याचे पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा:

आधीच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टीला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे: Devendra Fadnavis

Jay Shah: जय शाह यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याआधीच; केली मोठी घोषणा…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version