GST च्या दरात वाढ; पहा कोणत्या वस्तू महागल्या

28-29 जून रोजी झालेल्या जीएसटी काउंसिलच्या बैठकीमध्ये जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

GST – महागाईमुळे सर्वसामान्य जनता आधीच वैतागली आहे. त्यात या नाही तर त्या वस्तूंच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यातच आता सर्व सामान्य लोकांच्या चिंतेत आणखी वाढ होणार आहे. कारण जीएसटी काऊन्सिल (GST Council) ने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयामुळे सोमवारपासून अनेक वस्तूंचे दर वाढणार आहेत. यात प्री पॅकेजिंग आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर लागू होणार आहे.

हेही वाचा

भारतात लवकरच डिजिटल मीडिया संदर्भात कायदा लागू होणार

28-29 जून रोजी झालेल्या जीएसटी काउंसिलच्या बैठकीमध्ये जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 18 जुलैपासून याची अंमलबजावणी होणार आहे. अशा परिस्थितीत, घरगुती वस्तू, हॉटेल, बँक सेवा आणि बऱ्याच गोष्टींवर अधिक खर्च करण्याची तयारी सर्व सामान्यांना ठेवावी लागणार आहे. टेट्रा पॅकवरील जीएसटी दर 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील दर 0.25 टक्क्यांवरून 1.5 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा

या कारणामुळे कतरिनाने एकटीने साजरा केला वाढदिवस

बॅटरीसह किंवा त्याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांवर सवलतच्या दराने 5 % जीएसटी सुरू राहील. ट्रक, मालाच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर, ज्यामध्ये इंधनाचा खर्च समाविष्ट आहे, आता 18 टक्क्यांऐवजी 12 टक्के जीएसटी लागू होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांसारख्या सेवांसह निवासी घरे भाड्याने दिल्यास देखील त्यावर कर द्यावा लागणार आहे. बॅटरीसह किंवा त्याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांवर सवलतच्या दराने 5 % जीएसटी सुरू राहील.

Exit mobile version