spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

देशासह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, काळजी घेण्याचे आवाहन

२७ डिसेंबर रोजी दिल्लीमधील एकाला जे एन वन (JN.१) वेरीएंटची लागण झाल्याची नोंद करण्यात आली. त्यासोबतच जे एन वन चे गुजरातमध्ये ३६ गोव्यामध्ये १४  महाराष्ट्रात ९ कर्नाटक येथे ३४ केरळमध्ये सहा तर राजस्थान आणि तमिळनाडू मध्ये चार रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली आहे.

देशातलं थंडीचे प्रमाण सुद्धा वाढत आहे आणि त्याचबरोबरच कोरोनाच्या रुग्णांमध्ये सुद्धा वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा नवीन जे एन वन (JN.१) व्हेरिएंटमुळे आता नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. बहुतेक रुग्णांना जे एन वन (JN.१) वेरिएंटची लागण झाल्याची बातमी समोर येत असल्यामुळे सध्या देशात सर्वत्र काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

देशभरात एका दिवसात JN.१ वेरियंटचे १०० पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत आणि आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार पूर्ण देशभरात मागील २४ तासांमध्ये ५२९ रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या जे एन वन (JN.१) वेरिएंटच्या रुग्णांची संख्या ११० वर पोचली असून राजधानी दिल्ली (DELHI) मध्ये कोरोनाचे नव्या वेरियंटचा (NEW VARIENT) पहिला रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या नव्या जे एन वन (JN.१) वेरियंटच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली असून यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ११० इतकी झाली आहे. बुधवारी देशात एकूण ५२९ नवीन कोरोना रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून देशांमध्ये सध्या कोरोनाचे ४०९३ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

संपूर्ण देशभरात अनेक राज्यांमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या जे एन वन (JN.१) वेरिएंटमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले  आहे. मागच्या कोरोना (CORONA) सारखी पुन्हा परिस्थिती उद्भवू नये, याकडे नागरिकांना लक्ष देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. नवीन आलेल्या जे एन वन (JN.१) या वेरियंटचा रुग्ण गुजरात (GUJRAT) मध्ये सुद्धा आहेत ८ डिसेंबरला केरळमध्ये (KERALA) जे एन वन (JN.१) चा वेरीएंटचा पहिला रुग्ण सापडला होता आणि त्यानंतर आता हे रुग्ण संपूर्ण देशभरात आढळून येत आहेत.  २७ डिसेंबर रोजी दिल्लीमधील एकाला जे एन वन (JN.१) वेरीएंटची लागण झाल्याची नोंद करण्यात आली. त्यासोबतच जे एन वन चे गुजरातमध्ये ३६ गोव्यामध्ये १४  महाराष्ट्रात ९ कर्नाटक येथे ३४ केरळमध्ये सहा तर राजस्थान आणि तमिळनाडू मध्ये चार रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतेक कोरोना रुग्ण सध्या होम आयसोलेशन (HOME ISOLATION) मध्ये आहेत. तर महाराष्ट्रात नवीन कोविड रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून बुधवारी ८७ रुग्णांची नव्याने नोंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

‘Vd 18’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान वरुण धवणच्या पायाला दुखापत

अ‍ॅनिमलच्या यशानंतर तृपी डिमरी करणार कार्तीक आर्यनसोबत स्क्रीन शेअर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss