spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वाढलेले भाजीचे दर वाढवणार गृहिणींची चिंता…

घाऊक बाजारात ६० ते ८० रुपये किलोच्या घरात पोहोचल्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो भाजी विकत घेण्यासाठी १०० ते १२० रुपये मोजावे लागत आहेत.

भाजीपाला, फळे हे म्हणजे लवकर खराब होणारे खाद्यपदार्थ. डोकं तपवणारा उन्हाळा असुदे किंवा कुडकुडायला लावणारी थंडी असुदे, प्रत्येक ऋतुचा काही ना काही परिणाम हा भाजीपाल्यावर होतंच असतो आणि भाजीपाल्यावर परिणाम होतोय तो मुसळधार पावसाचा. याच पावसामुळे हल्ली बाजारात होणारी भाजीची आवक घटली आणि त्याच्यामुळे भाजीपाल्याचे दर सध्या गगनाला भिडले आहे.

मागणीच्या तुलनेत फार कमी प्रमाणात भाजीचा पुरवठा होत असल्यामुळे घाऊक बाजारात ६० ते ८० रुपये किलोच्या घरात पोहोचल्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो भाजी विकत घेण्यासाठी १०० ते १२० रुपये मोजावे लागत आहेत. बाजारसमितीने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी घाऊक बाजारात ५५० ते ६५० गाड्या भाजीपाल्याची आवक होत असे मात्र आता ५०० ते ५५० गाड्या भाजीपाल्याची आवक होते ज्यापैकी फक्त ४०० गाड्या भाजी ही विकण्याजोगी असते.

भाज्या खराब होण्याचं मूळ कारण म्हणजे कमी मजूर आणि पावसाळ्यात थेट शेतातून भाज्यांची पॅकिंग होऊन येताना, भाज्या आधीच ओल्या असतात. त्यानंतर शहरात पाठवण्यासाठी ह्या एका ट्रकमधून भरून पाठवल्या जातात. शहरात पोहोचेपर्यंत किमान ३ ते ४ तरी लागतात आणि त्यादरम्यान या ओल्या भाज्या खराब व्ह्यायला सुरुवात होते. भाजी खराब झाल्यामुळे किरकोळ बाजारात उरलेल्या चांगल्या भाजीचे दर खूप वाढतात.

सध्याचे घाऊक दर प्रतिकीलो:

  • भेंडी – ६० ते ७५ रू किलो
  • फरसबी – ६० ते ८० रू किलो
  • गवार – ५० ते ८० रू किलो
  • घेवडा – ४० ते ६० रू किलो
  • ढोबळी मिरची – ४० ते ६० रू किलो
  • हिरवा वाटाणा – ८० ते १०० रू किलो
  • वाल – ५० ते ६० रू किलो
  • चवळीची शेंग – ३५ ते ५० रू किलो
  • हिरवी मिरची – ५० ते ५५ रू किलो

Latest Posts

Don't Miss