spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतीय हवामान खात्याकडून ठाणे व पालघर जिल्ह्याला 8 जुलै रोजी रेडअलर्ट

मुंबईला पुढील पाच दिवस ऑरेंजअलर्ट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ठाणे-पालघर जिल्ह्याला उद्या 8 जुलै रोजी रेडअलर्ट देण्यात आलेले आहे.

ठाणे : मुंबईला पुढील पाच दिवस ऑरेंजअलर्ट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ठाणे-पालघर जिल्ह्याला उद्या 8 जुलै रोजी रेडअलर्ट देण्यात आलेले आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. आज मुंबईत काही ठिकाणी 200 मिमीहोऊन अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. तसेच मुंबईत 7 आणि 8 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे.

 ठाणे पालघरसह रायगड व तळ कोकणात 9 जुलै रोजी रेडअलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याकडून पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथे 8 जुलै रोजी रेडअलर्ट देण्यात आलेला आहे. राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे समुद्र व नदीकाठी वसलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून खबरदारी घ्यावी असे सांगण्यात आले आहे. राज्य प्रशासनाच्या सूचनाचे पालन करून सुरक्षित स्थळे आश्रय घ्यावा जीवीत, वित्तहानी होणार नाही यासाठी सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी. राज्य सरकारने एन डी आर एफ, एस डी आर एफ पोलीस, महसूल अधिकारी बचाव यंत्रणांना सतर्क ठेवून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत मिळायला हवी याची निश्चिती घ्यावी.

हेही वाचा :

पट्ठ्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात मारली डुबकी

नवी मुंबईत गेल्या 24 तासात 133 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे मोरबे धरणातली पाण्याची पातळी देखील 71 मीटर एवढी झालेली आहे. नवी मुंबईत बऱ्यापैकी पाऊस पडला असल्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे. वसई विरार परिसरात काल रात्रीपासून पावसाची सतत धार सुरू आहे.त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. पांढरतारा या पुलावरून नदीचे पाणी वाहत असल्यामुळे बारा गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाची सतत धार सुरू राहिली तर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

मुरांबा मालिकेत बरसणार प्रेमाचा पाऊस रमा – अक्षय मधलं नातं फुलणार

Latest Posts

Don't Miss