राज्यामध्ये पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस, भारतीय हवामान विभागाचा इशारा

राज्यामध्ये पुन्हा पुढील पाच दिवसामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.

राज्यामध्ये पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस, भारतीय हवामान विभागाचा इशारा

राज्यामध्ये पुन्हा पुढील पाच दिवसामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. विदर्भामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. १३ एप्रिल ते १५ एप्रिलला काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील काही भागांमध्ये येणाऱ्या पाच दिवसामध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यामध्ये तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. अवकाळी पावसामुळे वर्षभर मेहनतीने पिकवलेले सोन्यासारखं पिकाची माती झाली आहे. शेतमालाचा झालेलं प्रचंड नुकसान पाहून बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे राज्यामध्ये ३४ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे त्याचा प्राथमिक अंदाज आला आहे. राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी हि माहिती दिली आहे. प्रत्यक्ष पंचनामा झाल्यानंतर अचूक आकडेवारी समोर येणार आहे आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे असं कृषी आयुक्त सुनील चव्हाण म्हणाले. कृषी आयुक्त चव्हाण हे स्वतः नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर गेले आहेत.

नाशिक जिल्ह्यामधील बागलाण तालुक्यात त्यांनी नुकसानीचा आढावा त्यांनी घेतला आहे. अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्यामध्ये झाले आहे. नाशिक जिल्यात ८,००० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल नगर जिल्ह्यात ७,३०५ हेक्टरवरील मका, कांदा, वाटाणा, कलिंगड ,आंबा ,झेंडू आणि इतर पिकांचं नुकसान झाले आहे. यामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झालं आहे. द्राक्ष, आंबा, केळी संत्रा, काजू या बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. तसेच कलिंगड, गहू, कांदा, हरभरा, या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर, गहू, ज्वारी यासह आंब्याचा मोहर पूर्णपणे गळून गेला असून, नव्यानं लागवड केलेल्या भाजीपाल्याचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे.

हे ही वाचा : 

५६ वर्ष ज्या घराण्यामध्ये तुम्ही जन्माला आले ते घर टिकवू शकले नाही, नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Exclusive : भाजपाला पोहोचायचं राज्यातल्या ३ कोटी कुटुंबात

Armaan Malik ने दिली खुशखबर, दुसरी पत्नी Kritika Malik बनली आई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version