Indian Science Congress : नागपुरात ४९ वर्षांनंतर प्रथमच भारतीय विज्ञान परिषदेचे आयोजन

संत्रानगरीत अर्थात नागपुरात १९७४ नंतर प्रथमच भारतीय विज्ञान परिषदेचे (इंडियन सायन्स काँग्रेस) आयोजन करण्यात आले आहे.

Indian Science Congress : नागपुरात ४९ वर्षांनंतर प्रथमच भारतीय विज्ञान परिषदेचे आयोजन

संत्रानगरीत अर्थात नागपुरात १९७४ नंतर प्रथमच भारतीय विज्ञान परिषदेचे (इंडियन सायन्स काँग्रेस) आयोजन करण्यात आले आहे. १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला (Nagpur University) मिळाले आहे. ३ ते ७ जानेवारी दरम्यान विद्यापीठ परिसरात आयोजित या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली परिषदेच्या आयोजनासंदर्भात आढावा घेण्यात आला.

यापूर्वी १९७४ मध्ये नागपुरात (Nagpur) ६१ वी सायन्स काँग्रेस झाली होती. जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक मान्यवर शास्त्रज्ञ, संशोधक या काळात नागपूर शहरात असतील. याशिवाय गेल्या काळात महत्वपूर्ण संशोधन करणाऱ्या प्रमुख संस्था या ठिकाणी प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. देश विदेशातील वैज्ञानिकांचा समावेश आणि त्यांच्यासोबत विज्ञानात प्रगती असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संवादही या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे. या संमेलनामध्येच राष्ट्रीय किशोर विज्ञान संमेलन देखील घेण्यात येते. यासाठी किशोर वैज्ञानिकही नागपुरात मुक्कामी असतील. राष्ट्रीय स्तरावरील या संमेलनाच्या आयोजनाबाबत आज झालेल्या बैठकीला नागपूर जिल्हा प्रशासन, नागपूर महानगरपालिका, पोलीस प्रशासन, नागपूर विद्यापीठ आणि अन्य प्रमुख संस्थांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

दरवर्षी भारतातील प्रमुख शहरामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे (Indian Science Congress) या परिषदेचे आयोजन केले जाते. कृषी, वने, प्राणी, मत्स्य, पशुशास्त्र, अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र पर्यावरण माहिती तंत्रज्ञान, पदार्थ विज्ञान, सांख्यिकी, वैद्यकीय विज्ञान, नवीन जीवशास्त्र, अशा १४ विविध विभागांवर नवनवीन शोध प्रबंध, भव्य प्रदर्शनी, मार्गदर्शन आणि यामध्ये तज्ञांचा सहभाग, अशी विज्ञानाला समर्पित व्यापकता या संमेलनाची असते.

हे ही वाचा : 

महाराष्ट्रातील प्रकल्पांनंतर राज्यातील गावंही दुसऱ्या राज्याच्या घशात घालणार का? ; नाना पटोले

शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर उद्धव ठाकरे दिली महाराष्ट्र बंदची हाक म्हणाले, वेळ आली तर महाराष्ट्र…

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version