spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतातील पहिल्या मांडवा वॉटर टॅक्सीचा आजपासून शुभारंभ

भारतातील पहिली २०० प्रवासी क्षमता असलेल्या हाय स्पीड वॉटर टॅक्सीचा शुभारंभ आज मुंबईत झाला. या वॉटर टॅक्सीची मुंबई डोमेस्टिक क्रुज टर्मिनल्स ते मांडवा पहिली सफर करण्यात आली.

भारतातील पहिली २०० प्रवासी क्षमता असलेल्या हाय स्पीड वॉटर टॅक्सीचा शुभारंभ आज मुंबईत झाला. या वॉटर टॅक्सीची मुंबई डोमेस्टिक क्रुज टर्मिनल्स ते मांडवा पहिली सफर करण्यात आली. आजपासून या वॉटर टॅक्सीच्या रोज सहा फेऱ्या होणार असून सर्व सोयीसुविधांयुक्त आरामदायी आणि जलद प्रवासासाठी ही वॉटर टॅक्सी महत्वाची ठरणार आहे.

या वॉटर टॅक्सीमध्ये २ क्लास आहेत. एक आहे एक्झिक्युटिव्ह क्लास जिथे ४०० रुपये तिकीट असेल. तर, दुसरा आहे बिजनेस क्लास जिथे ४५० रुपये तिकीट आकारले जाईल. एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये १४० जणांची आसनक्षमता आहे. तर, बिजनेस क्लासमध्ये ६० जणांची आसनक्षमता आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक सीटच्या खाली लाईफ जॅकेट्स देण्यात आले आहेत. आगीसारखी घटना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी अंतर्गत स्प्रिंकलर्स लावण्यात आलेले आहेत. तसेच, प्रत्येक ठिकाणी स्मोक डिटेक्टर लावले गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व इक्विपमेंट नेव्हिगेशन ऑपरेशन या वॉटर टॅक्सीमध्ये होत आहेत. त्याशिवाय प्रवाशांना उन्हाळा, पावसाळा असो किंवा हिवाळा या तिन्ही ऋतूत या टॅक्सीतून प्रवास करता येईल. सीसीटीव्ही सोबतच ब्लॅक बॉक्ससुद्धा आतमध्ये आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्ण काळजी घेतली गेली आहे. या टॅक्सीच्या दिवसातून सहा फेऱ्या होणार आहेत.

अवघ्या ३५ मिनिटांत प्रवासी मुंबई ते मांडवा हा प्रवास या वॉटर टॅक्सीतून पूर्ण करू शकतात. लवकरच गेटवे ते बेलापूर अशीच वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना जलवाहतुकीचा आणखी उत्तम पर्याय या वॉटर टॅक्सीमुळे उपलब्ध झाला आहे. त्यात आता रोरोनंतर या वॉटर टॅक्सीलासुद्धा प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.

भारतातील पहिली २०० प्रवासी क्षमता असलेली नवीन शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नयन इलेव्हन हाय स्पीड वॉटर टॅक्सी आहे. या वॉटर टॅक्सीच्या प्रवासाचा आजपासून शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवसापासून प्रवाशांनी या वॉटर टॅक्सीचं बुकिंग सुरू केलं आहे. त्यानुसार, वॉटर टॅक्सीतून प्रवासी या डोमेस्टिक क्रूज टर्मिनसपासून ते मांडवा अशी पहिली सफर करू शकतील.

मुंबईत नव्याने सुरु झालेल्या या वॉटर टॅक्सीचा स्पीड १६ नोडस प्रति तास आहे. या वॉटर टॅक्सीमध्ये २०० जणांची आसनक्षमता आहे. इतकी गर्दी असूनसुद्धा टॅक्सीच्या बाहेरील समुद्राची दृश्य अगदी आरामात पाहता येतात. या टॅक्सीमुळे प्रवासी अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत मांडवापर्यंत प्रवास पूर्ण करू शकणार आहेत.

हे ही वाचा:

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात, पायी चालण्यासाठी राज्यातील नेत्यांची ‘कसरत’ सुरू

Whatsapp New Feature : व्हॉट्सॲपचं नवं फिचर अनोखे ! घ्या जाणून संपूर्ण माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss