ऐन दिवाळीत महागाई वाढण्याची शक्यता

ऐन सणासुदीच्या काळात महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कारण सप्टेंबर महिन्यात महागाई दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

ऐन दिवाळीत महागाई वाढण्याची शक्यता

ऐन सणासुदीच्या काळात महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कारण सप्टेंबर महिन्यात महागाई दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये ग्राहकमूल्य निर्देशांक (CPI) ७.४१ % वर गेल्याने महागाई पाच महिन्यांच्या उच्चांवर पोहोचली आहे.

सलग दुसऱ्या महिन्यात किरकोळ महागाईत वाढ झाली असून, सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ७.४१ टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई ७ टक्के तर, जुलैमध्ये हा दर ६.७१ टक्क्यांवर होता. सप्टेंबर महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागात खाद्यपदार्थांच्या महागाईत वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यातील ७ टक्क्यांवरील महागाई दर होता तोच आता सप्टेंबर महिन्यात ७.४१ टक्क्यांवर गेला आणि यासोबतच खाद्य पदार्थांचा महागाई दर ७. ६२ टक्क्यांवरून ८.६० टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरी आणि ग्रामीण महागाई दरातही वृद्धी झाली आहे. अनियमित पाऊस, पुरवठ्यातील धक्का यामुळे किरकोळ चलनवाढीचा दर सप्टेंबरमध्ये ७.४१ टक्क्यांच्या ५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

एक वर्षापूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये किरकोळ महागाई दर ४.३५ टक्के होता. यावर्षी सप्टेंबर महिन्यात अन्नधान्याच्या किमतीत ८.६० टक्क्यांची वाढ पाहण्यास मिळाली. जी ऑगस्टमध्ये ७.६२ टक्क्यांवर होती. जुलैमध्ये ही आकडेवारी ६.७५ टक्के आणि जूनमध्ये ७.७५ टक्क्यांवर होती. भाज्यांच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे ऑगस्ट २०२२मध्ये १३.२३ टक्क्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये भाज्यांचे दर १६.७८ टक्के झाला आहे.

अपेक्षेप्रमाणे सप्टेंबरमध्ये महागाई वाढल्याने अन्नधान्याच्या किमती वाढल्या होत्या, अन्नधान्य महागाई ऑगस्टमधील ७.६२ टक्क्यांवरून ८.६ टक्क्यांवर पोहोचली होती. अन्नधान्य चलनवाढीचा आकडा २३ महिन्यांतील सर्वाधिक आहे. भारताची किरकोळ चलनवाढ, अन्नधान्याच्या चढ्या किमती, अनियमित पाऊस आणि रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पुरवठा साखळीला बसलेले धक्के या सगळ्याचा परिणाम असल्याचं बोललं जातंय. सर्वात मोठी श्रेणी असलेल्या अन्नधान्य आणि भाजीपाला यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती गेल्या दोन वर्षांत वाढल्या आहेत. तर दुसरीकडे अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या (IIP) नुसार कारखाना उत्पादन ऑगस्टमध्ये (-) ०.८ टक्क्यांनी संकुचित झाले.

हे ही वाचा :

Modi Cabinet : रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी मंत्रिमंडळाची दिवाळी भेट, ७८ दिवसांचे वेतन मंजूर केले

‘… त्यामुळे खरी शिवसेना कोणती हे सिद्ध झालंय’ – संजय मंडलिक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version