समृद्धी महामार्गावर सहा महिन्यात ५ हजार ३६२१ वाहनांची तपासणी

समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) मागील काही दिवसांपासून अनेक अपघात झाले आहेत.

समृद्धी महामार्गावर सहा महिन्यात ५ हजार ३६२१ वाहनांची तपासणी

समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) मागील काही दिवसांपासून अनेक अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्ग मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका बसचा अपघात होऊन २१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.तसेच २३ प्रवाशी जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताची मालिका रोखण्यासाठी आरटीओ प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपयायोजना केल्या जात आहेत. मागील सहा महिन्यांमध्ये ५ हजार ३६२१ वाहनांची तपासणी आरटीओच्या पथकाने केली आहे.

समृद्धी महामार्गावर मागील काही महिन्यांपासून सतत अपघात होत आहेत. आरटीओ विभागाकडून सतत उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्यात समृद्धी महामार्गावर वाहन येताच त्या वाहनांच्या टायरची तपासणी केली जाते. जर वाहनांचे टायर ठरलेल्या नियमांनुसार नसल्यास त्या वाहनांना समृद्धी महामार्गावर एन्ट्री दिली जात नाही. तसेच दारू पिऊन गाडी चालवल्यास वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात येतो. त्या वाहनांना देखील एन्ट्री दिली जात नाही. मागील सहा महिन्यात समृद्धी महामार्गावर एकूण ५ हजार ३६२१ वाहनांची तपासणी आरटीओच्या पथकाने दिली आहे. ज्यामध्ये ९ हजार ६७० वाहनांची तपासणी छत्रपती संभाजीनगरच्या आरटीओ पथकांनी केली.

छत्रपती संभाजीनगर आरटीओ ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची मोहीम (जून ते ऑक्टोबर)
९९० बसची तपासणी करण्यात आली.
३ हजार ७८ ट्रक चालकांची तपासणी करण्यात आली.
४ डिटेक्ट चालकांवर कारवाई करण्यात आली.

संपूर्ण समृद्धीवर आरटीओकडून ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची मोहीम (जून ते ऑक्टोबर)

५ हजार ३२० बसची तपासणी करण्यात आली.
८ हजार २०१ ट्रक चालकांची तपासणी करण्यात आली.
१३ चालकांवर ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची कारवाई करण्यात आली.

हे ही वाचा: 

‘किंग’ कोहलीकडून बाबर आझमला जर्सी भेट

फाल्गुनी पाठकच्या दांडियाच्या कार्यक्रमात १५६ तरुणांची फसवणूक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version