महाराष्ट्रात पाऊस बरसला, उकाड्याने हैराण नागरिक सुखावले

महाराष्ट्रामध्ये पावसाची सुरुवात झाली आहे, मुंबई आणि पुण्यासह अनेक जिल्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. राज्यामध्ये मान्सूनचे आगमन यावर्षी लेट झाले त्यामुळे उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते.

महाराष्ट्रात पाऊस बरसला, उकाड्याने हैराण नागरिक सुखावले

महाराष्ट्रामध्ये पावसाची सुरुवात झाली आहे, मुंबई आणि पुण्यासह अनेक जिल्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. राज्यामध्ये मान्सूनचे आगमन यावर्षी लेट झाले त्यामुळे उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. कालपासून पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे आता नागरिक सुखावले आहेत. बीड जिल्ह्यातील शिरूर गेवराई आणि केज तालुक्यामध्ये मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून केज तालुक्यातल्या माळेगाव आणि युसूफवडगाव या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना आणि ओढ्यांना पूर आला होता. तर या मुसळधार पावसामध्ये माळेगाव येथे वीज पडून एक गाय ठार झाले असून वडगाव येथील एक म्हैस पुरात वाहून गेली आहे.

मुंबई आणि दिल्लीत मान्सून सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) करण्यात आली आहे. मुंबईत ११ जून रोजी मान्सून दाखल होण्याची तारीख आहे. तर दिल्लीत २७ जून रोजी मान्सून दाखल होत असतो. मात्र, यावर्षी मुंबईत १४ दिवस उशिराने मान्सून दाखल झाला आहे तर दिल्लीत दोन दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. कोयना धरणाला उपयुक्त असणाऱ्या महाबळेश्वरात तब्बल ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकरी ज्या मान्सूनच्या प्रतिक्षेत होते त्या मान्सूनच्या सरी आता बरसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं बळीराजा सुखावला आहे. चिपळूण, खेड, दापोली परीसरामध्ये सकाळपासूनच मान्सूनच्या सरी बरसत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यात रिमझिम पावसानं हजेरी लावली. पाऊस पुढच्या २४ तासात कोल्हापूर जिल्ह्यात सक्रिय होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुखद गारवा मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

आता ईडीमुळे सांगलीत देखील खळबळ, पाच व्यापारी ईडीच्या रडारवर

Sundar Pichai यांनी PM Modi यांच्या डिजिटल इंडियाचे केले कौतुक

अल-हकीम मशिदीला भेट देण्यापासून ते अल-सिसीला भेटण्यापर्यंत, जाणून घ्या पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version