धक्कादायक घटना ! जळगावात अल्पवयीन भावानं केली बहिणीसह तिच्या प्रियकराची हत्या

धक्कादायक घटना ! जळगावात अल्पवयीन भावानं केली बहिणीसह तिच्या प्रियकराची हत्या

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रेमसबंध असलेले तरुण आणि तरुणीची हत्या करण्यात आली आहे. एका भावाने रक्षाबंधनच्या दुसऱ्यादिवशी आपल्या अल्पवयीन बहिणीची आणि तिच्या प्रियकराची हत्या केली. तरुणाला गोळ्या झाधून मारलं. नंतर त्याने बहिणीची गळ्या दाबून हत्या केली. या घटनेनंतर आरोपी हातात पिस्तुल घेऊन पोलिस ठाण्यात गेला. वर्षा कोळी वय वर्ष 20 राहणार सुंदरगगढी, चोपडा येथे आणि राकेश संजय राजपूत वय वर्ष 22 राहणार रामपूरा चोपडा येथे ही मयत व्यक्तींची नाव आहेत.

मुख्यमंत्र्यांचा ठाण्यात होणार सत्कार; निवासस्थानापासून निघणार मिरवणूक

जळगाव जिल्यातील चोपडा शहर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रात्री 10:30 च्या सुमारास 17 वर्षीय एक अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन पोलिसात हजर झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी चोपडालगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्यचे समोर आले. पोलिसांनी दोन अल्पवयीन भावासह दोन संशियत आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर आणखी दोघांचा शोध सुरु असलायची माहिती पोलिसांनी दिली.
प्रेम संबंधातून खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी मयत तरुणीचा संशयित अल्पवयीन भावानेच दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांविरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले हे करीत आहेत.

नेमके काय घटले ?

रामपुरा येथे राहणाऱ्या वर्षा कोळीचे चोपडा शहरात राहणाऱ्या राकेश राजपूतसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. हे दोघे लग्न करणार होते. वर्षाच्या घरातून त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. त्यामुळे वर्षा लग्न करण्यासाठी शुक्रवारी रात्री राकेशसोबत पळून जाणार असे त्यांचे ठरले होते. याची माहिती वर्षाचा छोट्या भावाला मिळाली. त्यामुळे तिचा भाऊ वर्षावर लक्ष ठेवू होता. राकेश वर्षाला घेऊन जाण्यासाठी तिच्या घरी आला. त्यावेळी वर्षाच्या भावासह तीन जणांनी तिला आणि राकेशला दुचाकीवर बसवून चोपडा ते वराडे रस्त्याच्या शेजारी असलेल्या नाल्याजवळ नेले.

हेही वाचा : 

समीर वानखेडे जन्मतः मुस्लीम नाही, समितीचा निकाला

Exit mobile version