Wednesday, September 4, 2024

Latest Posts

Jalna Accident: पंढरपूरहुन परतणाऱ्या भाविकांची जीप विहिरीत कोसळली, अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू

Jalna Accident: आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या जीपचा आज (शुक्रवार, १९ जुलै) जालना जिल्ह्यातील राजूर येथे भीषण अपघात झाला. राजूर येथील तुपेवाडी जवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात टॅक्सी थेट विहिरीत कोसळली आणि त्यात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पंढरपूर येथून पांडुरंगाचे दर्शन घेऊन हे भाविक जालन्याहून एका टॅक्सीने राजूर गावाकडे निघाले होते. या जीप मध्ये पंधरा प्रवासी प्रवास करत होते. त्यादरम्यान जालन्यातल्या तुपेवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि जीपचा अपघात घडला. ज्यात दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात काळी पिवळी जीप विहिरीत कोसळली. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून आठ जणांचा जीव वाचला आहे. अपघातात बचावलेल्या आठ जणांवर जालन्यात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून शोध कार्य सुरु करण्यात आले आहे. मृतांमध्ये प्रल्हाद महाजन, रा.चनेगाव, ताराबाई मालुसरे, रा.तपोवन, नंदा तायडे, रा.चनेगाव, प्रल्हाद बिटले, रा. चनेगाव, नारायण किसन निहाळ, रा. चनेगाव, चंद्रभागा घुगे रा.चनेगाव, रंजना कांबळे रा. जालना अशी मृत झालेल्यांची नावे आहे.

दरम्यान या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दाखल घेतली असून त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारना केली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदतराज्य सरकार तर्फे करण्यात येणार आहे. याबाबत जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी, ‘घटनेची चौकशी केल्यानंतर अपघात कसा झाला हे कळेल,’ अशी माहिती दिली. दरम्यान या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय. जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फोजफाट्यासह घटनास्थळावर दाखल झाले आहेत. यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांच्यासह अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल होत त्यांनी मदत कार्य सुरु केले आहे.

जालन्याच्या बदनापूर अंबड विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांनी चणेवाडी येथील अपघात स्थळी पाहणी केलीय. या घटनेमुळे अंबड बदनापुर विधानसभा मतदारसंघात शुभकळा पसरली असून ती न भरणारी असल्याची प्रतिक्रिया कुचे यांनी दिली. मुख्यमंत्री सहायता निधीतून जी काही मदत जखमी आणि मयतांना करण्यात येईल ती मदत मी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कुचे म्हणालेत.

हे ही वाचा:

विशाळगडावरील निष्कासन कारवाईत उच्च न्यायालयाचा अवमान, जितेंद्र आव्हाड यांनी केला पर्दाफाश

Pooja Khedkar IAS पद गमावणार, प्रकरणावर PMO ची बारीक नजर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss