कांदा निर्यातीवरून जयंत पाटलांनी केली सरकारवर जोरदार टीका

राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

कांदा निर्यातीवरून जयंत पाटलांनी केली सरकारवर जोरदार टीका

राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होतं आहे. त्यातचं केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. याचा मोठ्या प्रमाणावर फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याचं कांदा निर्यातीच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील ( Jayant Patil) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. कांदा निर्यात बंदी उठवली गेली असे सगळीकडे बोलले जात आहे. पण सत्य परिस्थिती पाहता कांदा निर्यात बंदी उठवली गेलेली नाही, असे जयंत पाटील म्हणाले. व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा इशारा जयंत पाटीलांनी दिला आहे.

मागील २ ते ३ दिवसांपासून कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्यात आली अश्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र या सगळ्या अफवा आहेत. कांदा निर्यात बंदी हटवण्यात आली अश्या बातम्या सातत्याने सोशल मीडियावर येत आहेत. त्यामुळे कांदा निर्यातीबाबत सरकारने देखील स्पष्टीकरण दिले आहे. कांद्यावरील निर्यात बंदी न हटवल्याने जयंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. जयंत पाटील यांनी लिहिले आहे, कांदा निर्यात बंदी उठवली यांवरून काही जण उगाच टाळ्या वाजवत होते. सत्य परिस्थिती ही आहे की, कांदा निर्यातबंदी उठवलीच गेली नाही. राज्यात चालू रब्बी हंगामात ४ लाख ३२ हजार ७९८ हेक्टरवर कांदा लागवड झाल्याची माहिती आहे. त्यातून हंगाम अखेर सुमारे ८६ लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज आहे. सरकार निर्यातबंदी कायम ठेवत असेल तर कांद्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते व शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान होऊ शकते. व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा!, असे जयंत पाटील यांनी लिहिले आहे.

कांदा निर्याती बंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. मागील २ ते ३ दिवसांपासून कांडा निर्यातबंदी हटवल्याचे बोलले जात आहे. मात्र, कांद्यावरील निर्यात बंदी अजूनही हटवण्यात आलेली नाही. केंद्र सरकारकडून ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी लागू करण्यात आली आहे. निर्यातबंदी लागू करण्यात आल्यामुळे कांद्याचे दर वाढण्याची कमी शक्यता आहे.

हे ही वाचा:

 ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचा  धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Manoj Jarange Patil यांनी सरकारला दिला इशारा, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version