spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Jaydeep Apate Arrest: असा पकडला जयदीप आपटेला… कल्याणच्या डीसीपी यांनी सांगितला थरार

Jaydeep Apate Arrest: सिंधुदुर्ग येथील राजकोट (Rajkot) येथे उभारण्यात आलेला पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. या पुतळ्याचा शिल्पकार आणि फरार आरोपी जयदीप आपटे (Jaydeep Apate) याला तब्बल अकरा दिवसानंतर पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. काल (बुधवार, ४ सप्टेंबर) रात्री कल्याण येथून त्याला अटक करण्यात आली आहे. आज (गुरुवार, ५ सप्टेंबर) त्याला मालवण पोलीस ठाण्यात आणले गेले असून त्याला आज सिंधुदुर्ग न्यायालयात हजर केले आहे. जयदीप आपटेला पकडण्यासाठी कल्याण पोलिसांनी कश्या पद्धतीने रचला याबाबत आता कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ (Kalyan DCP Sachin Gunjal) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले डीसीपी सचिन गुंजाळ?

जयदीप आपटेला काल अटक केल्यानंतर आज माध्यमांशी संवाद साधत कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी भाष्य केले आहे. घडलेल्या थरारबद्दल भाष्य करत ते म्हणाले, “मालवण राजकोट प्रकरणातील फरार शिल्पकार जयदीप आपटे हा कल्याणला राहणार आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशितोष डुंबरे यांनी त्याला अटक करण्याची जबाबदारी कल्याण पोलिसांवर दिली होती. शिल्पकार जयदीप आपटे याला अटक करण्यासाठी कल्याण पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली होती. जयदीप आपटे लपण्याच्या सर्व संशयित ठिकाणावर आम्ही पाळत ठेवून होतो. काल खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली की जयदीप आपटे कल्याणमध्ये येणार आहे. यासाठी विशेष पथके नेमण्यात आली होती, एक पथक रेल्वे स्टेशन आणि एक पथक त्याच्या राहत्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. काल रात्री शिल्पकार जयदीप आपटे याला त्याच्या घराजवळून ताब्यात घेण्यात आले. सिंधुदुर्ग पोलिसांच्या टीमकडे सुरक्षितरित्या जयदीप आपटे याला सोपवण्यात आले,” असे ते म्हणाले.

अशी घडली घटना

सिंधुदुर्ग राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जनमानसात संतप्त लाट उसळली. या घटनेनंतर पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे याला अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. आपटे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्याच्या दिवसापासून आपटे पसार झाला होता. आपटे याच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध तपास पथके तयार केली होती. घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपटे याच्या कल्याण मधील बाजारपेठ परिसरातील घराला कुलूप होते. त्यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेड यांनी आंदोलन करून त्यांच्या घरावर शिवद्रोही असे लिहीत त्याचा फोटो चिटकवण्यात आला होता. त्याच्या घरासमोर अंडी फोडून निषेध करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली. आपटे याच्या विषयी माहिती घेतली होती. तसेच त्याच्या पत्नी त्यांच्या कल्याण मधील घरी परतल्या होत्या. जयदीप आपटे याला तात्काळ अटक पोलीस पथके मागावर होती. बाजारपेठ पोलिसांना अशी माहिती मिळाली की आपटे हा त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्याच्या कल्याण मधील बाजारपेठे येथील घरी येणार आहे. पोलिसांनी आपटेला त्याच्या घरी येतानाच अटक केली आहे. त्याला अटक करून तात्काळ पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या कार्यालयात हजर केले गेले. पोलिसांकडून त्याची पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.

जयदीप आपटेला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

सिंधुदुर्ग येथील राजकोट येथे उभारण्यात आलेला पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. या पुतळ्याचा शिल्पकार आणि फरार आरोपी जयदीप आपटे याला तब्बल अकरा दिवसानंतर पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. काल रात्री कल्याण येथून त्याला अटक करण्यात आली आहे. आज त्याला मालवण पोलीस ठाण्यात आणले गेले असून त्याला आज सिंधुदुर्ग न्यायालयात हजर केले. त्याच्यासोबतच बांधकाम सल्लागार चेतन पाटील यालादेखील न्यायालयात हजार करण्यात आले असून न्यायालयाने या दोघांनाही १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Latest Posts

Don't Miss