Jaykumar Gore आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला भीषण अपघात, गंभीर दुखापत

Jaykumar Gore आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला भीषण अपघात, गंभीर दुखापत

आज २४ डिसेंबर पहाटे भाजप आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jayakumar Gore) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गाडी ५० फुट खोल दरीत कोसळली. फलटणजवळील पुणे पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. आमदार . गोरे हे सातारा जिल्ह्यातील मान-खटावचे आमदार आहेत. जयकुमार गोरेंसह तिघे जण गाडीत उपस्थित होते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती आहे. बसपाचा नागपुरात आक्रोश मोर्चा । Maharashtra Assembly Winter Session 2022 मिळालेल्या माहितीनुसार भाजप आमदार जयकुमार गोरे ( MLA Jaykumar Gore) हे पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला. मात्र, काळोखामुळे कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं आहे. साताऱ्यातील फलटणजवळ त्यांच्या गाडीला अपघात होऊन गाडी तब्बल ५० फूट दरीत कोसळली. नदीच्या पुलाचा कठडा तोडून गाडी ५० फूट खाली कोसळली. साताऱ्यातील फलटणजवळून वाहणाऱ्या बाणगंगा नदीच्या पुलावरुन जात असताना गाडीला अपघात झाला आहे. या अपघातातुन आमदार जयकुमार गोरे हे थोडक्यात बचावले. पण त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या आमदार जयकुमार गोरे आणि हा अपघात झाला आहे.गोरेंसह उपस्थित आणखी तिघानाही दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात झाली होती. सध्या आमदार गोरे आणि गाडीत उपस्थित असलेल्या आणखी तिघांनाही पुण्यातील येथील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चौघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे. आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या छातीला आणि डोक्याला मार लागला असल्याचे सांगितलं जात आहे. सध्या आमदार जयकुमार गोरे यांच्यावर उपचार सुरु आहे.गोरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्तरांकडून देण्यात आली आहे.आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा अपघात हा अपघात पहाटे ३ ते ७: ३० च्या दरम्याने झाला असल्याचे पोलिसांकडून सांगितलं जात आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित बचाव कार्याला सुरुवात केली.

हे ही वाचा:

Christmas party हे स्नॅक्स ख्रिसमस पार्टीसाठी तुम्ही बनवू शकता, जाणून घ्या पद्धत किडनीचे आरोग्य जपायचे ? मग ‘या’ सवयी बदला, आणि राहा समस्यांपासून दूर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version