spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

स्वस्त दरात लवकरच उपलब्ध होणार जिओ 5G फोन

Jio ची महत्त्वाकांक्षी 5G रोलआउट योजना जगातील सर्वात वेगवान असेल

भारतात 5G सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या स्पर्धेतील एक नाव म्हणजे जिओ. जिओ नेहमीच ते पुरवत असलेल्या सेवा आणि प्लॅन्ससाठी ओळखले जाते आणि आता जीओ एक पुन्हा एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. रिलायन्स जिओचा 5G फोन हा दिवाळीपूर्वी बाजारात दाखल होणार आहे. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिवाळीपूर्वी देशात जिओ 5G ची सुरु होणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात देशातील प्रमुख महानगरांमध्ये 5 G सेवा सुरु होणार आहे. मुंबईमध्ये दिवाळीपूर्वी जिओ 5G सेवा लाँच होणार आहे. गेल्या वर्षी जिओ आणि अँपल यांनी एकत्रपणे Jio Phone Next एक 4G फोन लाँच केला होता आणि यावर्षी ते असाच एक 5G फोन लाँच करणार आहे.

या Jio Phone 5G फोनला 6.5 इंच आकाराचा HD डिस्प्ले असण्याची शक्यता असून, त्या फोनला 4 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज क्षमता असेल. ड्युएल कॅमेरा सिस्टीम असलेल्या या फोनला 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर असेल. त्याशिवाय अँड्रॉइडची खास बनवण्यात आलेली Pragati ऑपरेटिंग सिस्टीमही या फोनमध्ये असेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

जिओने दिवाळी 2022 पर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या मेट्रो शहरांमध्ये Jio 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली. डिसेंबर 2023 पर्यंत 18 महिन्यांत संपूर्ण भारत कव्हर करण्यासाठी टप्प्याटप्प्याने इतर शहरे आणि शहरांमध्ये त्याचा विस्तार केला जाईल. Jio ची महत्त्वाकांक्षी 5G रोलआउट योजना जगातील सर्वात वेगवान असेल

io Phone 5G ची किंमत 20 हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. ग्राहकांना हा फोन विकत घेण्यासाठी 2500 रुपयांचं डाउन पेमेंट करावं लागण्याची शक्यता आहे. याआधी आलेल्या Jio Phone Next सोबत बंडल्ड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग या सुविधा देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणेच या सुविधा Jio Phone 5G सोबतही दिल्या जाण्याची शक्यता आहे. तसंच, कोणत्याही जिओ स्टोअरमध्ये आणि Amazon वर उपलब्ध केला जाणार आहे.

हे ही वाचा:

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते ए.एम.नाईक शाळेचा उदघाटन सोहळा

किशोरी पेडणेकरांनी अमित शहांना दिले उत्तर म्हणाल्या आम्ही तुम्हाल जमिनीवर आणू…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss